चंदीगड : आगामी लोकसभा निवडणूक 2024 साठी देशात तिसरी आघाडी स्थापन ( THIRD FRONT RALLY ) करण्याची कसरत सुरू झाली आहे. देशाचे माजी उपपंतप्रधान आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री चौधरी देवी लाल यांच्या 109 व्या जयंतीनिमित्त आज फतेहाबादमध्ये सम्मान दिन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. INLD च्या सन्मान दिन रॅलीमध्ये नितीश कुमार, तेजस्वी यादव, शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षांचे प्रमुख नेते उपस्थिती आहेत. सन्मान दिनाच्या रॅलीला संबोधित करताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. 2024 मध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी पक्ष काँग्रेसचाही पाठिंबा घेणार असल्याचे ते म्हणाले.
शरद पवारांनी मोदी सरकारवर श्रीमंतांचे सरकार असल्याचा आरोप केला - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या भाषणात ताऊ देवीलाल यांच्यासोबत घालवलेले दिवस आठवले. शरद पवार म्हणाले की, ताऊ देवीलाल देशाचे उपपंतप्रधान झाले, त्यावेळी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. देवीलाल यांनी नेहमीच गरीब घटकांसाठी काम केले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार श्रीमंत आणि उद्योगपतींसाठी काम करत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. पवार म्हणाले की, आजचे सरकार कोट्यधीशांचे कोट्यवधींचे कर्ज माफ करत आहे तर दुसरीकडे वाढत्या महागाईने सामान्य माणूस त्रस्त आहे.
आता एनडीए नाही – तर बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांनी भाजपशी संबंध तोडण्याच्या धाडसी निर्णयाबद्दल त्यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, आता एनडीए नाही. शिवसेना, अकाली दल, JD(U) या भाजपच्या मित्रपक्षांनी लोकशाही वाचवण्यासाठी त्याचा त्याग केला आहे.
सीताराम येचुरी यांनी भाजपची तुलना राक्षसांशी केली - रॅलीत आलेले सीपीआय(एम) नेते सीताराम येचुरी यांनी भाषणादरम्यान भाजपची तुलना राक्षसांशी केली आणि ते म्हणाले की भाजपचे लोक आज देशात लोकशाही आल्याचा दावा करतात. समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा अमृत बाहेर आले तेव्हा ते प्रथम राक्षसांनी पकडले. त्यानंतर देवांना युद्ध करून ते अमृत राक्षसांपासून परत घ्यावे लागले. आजही देशवासीयांनी त्याच पद्धतीने भाजपच्या विरोधात एकजूट होण्याची गरज आहे. ते म्हणाले की, केरळ हे देशातील एकमेव राज्य आहे जिथे सीपीआय सरकार आणि केरळच्या जनतेने त्यांच्या राज्यात भाजपचा एकही आमदार जिंकू दिला नाही.
ताऊ देवीलाल यांच्या जयंतीनिमित्तसर्व विरोधी पक्षांचे नेते एका व्यासपीठावर असल्याने कुठेतरी तिसरी आघाडी म्हणून नक्कीच पाहायला मिळेल. सर्व नेते एका व्यासपीठावर आल्यावर तिसर्या आघाडीची चर्चा होईल, असे INLD नेते अभय चौटाला यांनी म्हटले आहे. काँग्रेसला यातून बाहेर ठेवता येणार नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे. याचेही उदाहरण देताना चौधरी देवीलाल यांनी जेव्हा तिसरी आघाडी स्थापन केली तेव्हा भाजपलाही सोबत घेतले होते. संपूर्ण देशात तिसरी आघाडी बनण्याची चर्चा असून हरियाणाच्या मातीतील सर्व नेत्यांनी चर्चा करून परिवर्तनाची सुरुवात करावी, असा त्यांचा प्रयत्न असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.