देवास (मध्य प्रदेश)- मध्य प्रदेशातील उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर घरफोडी करणाऱ्या या चोरांनी उपजिल्हाधिकाऱ्यासाठी एक चिठ्ठीही सोडली आहे. ही चिठ्ठी आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. चोर चोरी करतो पण त्याच्या घरी चोरी केली त्याला कधी चिठ्ठी लिहित नाही. पण या चोराने चक्क उपजिल्हाधिकाऱ्याला चिठ्ठी लिहिली आहे.
घरात पैसेच नाही, तर घर लॉक का केले -चोरी केल्यावर चोराची कलेक्टरला चिठ्ठी
जर घरात पैसेच नव्हते तर लॉक करायचं नव्हतं कलेक्टर, असे या चोरांनी या चिठ्ठीत लिहिले आहे. उपजिल्हाधिकारी त्रिलोचन गौर काही कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. यावेळी त्यांचे कुटुंबीय घरी नव्हते. देवास येथील खाटेगाव तहसीलमध्ये ते कार्यरत आहेत. गेल्या १५ ते २० दिवसांपासून ते घरी नव्हते. ते घरी परतले तेव्हा घरातील सामान विस्कटलेलं पाहिल्यानंतर आणि काही रोख रक्कम, दागिने चोरी झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

३० हजार रोख रक्कम आणि काही दागिने त्रिलोचन गौर यांच्या सरकारी निवासस्थानावरुन चोरीला गेले आहेत. चोरी नेमकी किती वाजता झाली याची माहिती मिळालेली नाही. पण चोरांनी लिहिलेल्या चिठ्ठीची सध्या प्रचंड चर्चा सुरु आहे. चोराने चक्क गौर यांच्या नावाने चिठ्ठी लिहिली आहे. त्यात त्याने घरात पैसे नसतील तर घर लॉक का केले असा सवाल विचारला आहे.