सिधी : मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सुरक्षेत मोठी चूक समोर आली आहे. आता मुख्यमंत्र्यांसोबत बसून पंगतीत जेवत असलेल्या चोराचा फोटो व्हायरल होत आहे. पाच दिवसांपूर्वी लाकूड चोरल्याप्रकरणी हा आरोपी तुरुंगातून बाहेर आला. 15 एप्रिल रोजी सीधी जिल्ह्यातील जमीन हक्क वितरण कार्यक्रमाला मुख्यमंत्री पोहोचले. सीएम शिवराज यांचे एक छायाचित्र सोशल मीडियावर चर्चेत आहे. या घटनेमुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, अरविंद गुप्ता या चोरट्याने सुरक्षा व्यवस्था तोडून या कार्यक्रमात प्रवेश केला.
जेवणाचा आनंद लुटणारा चोर सोशल मीडियावर व्हायरल :ही घटना राज्यातील सिधी जिल्ह्याशी संबंधित आहे. व्हिडिओमध्ये अरविंद गुप्ता हा मध्य मुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसून जेवताना दिसत आहे. मेजवानीत जेवणाचा आनंद लुटणारा चोर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतील त्रुटी कशामुळे आल्या, हे स्पष्ट झाले नाही. प्रशासनातील अनेक उच्चपदस्थ अधिकारी घटनास्थळी होते. यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा पंचायत अधिकारी, एसएचओ आणि प्रशासनातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मात्र, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या शेजारी बसून चोरटे जेवण करत असल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही.