महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

नवरात्री विशेष : अमृतसरच्या दुर्गियाना मंदिरात जगप्रसिद्ध लंगूर मेलाला सुरुवात - जगप्रसिद्ध लंगूर मेलाला सुरुवात

ज्याच्या घरी पुत्रप्राप्ती होत नाही, असे लोक याठिकाणी येऊन देवाला साकडं घालतात. वडाच्या झाडाला दौरा बांधून हे साकडं घातलं जाते. त्यानंतर ज्यांना पुत्रप्राप्ती होते, ते नवरात्रीत दहा दिवस हनुमानाच्या मंदिरात लंगूर च्या वेशभूषेत दिवसातून दोन वेळा त्या पुत्राला पाया पडाव्या लागतात. तसेच दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मुलांवर लंगूरचा वेश उतरवला जातो.

जगप्रसिद्ध लंगूर मेलाला सुरुवात
जगप्रसिद्ध लंगूर मेलाला सुरुवात

By

Published : Oct 7, 2021, 7:09 PM IST

अमृतसर -येथील दुर्गियाना मंदिरात नवरात्री निमित्त जगप्रसिद्ध लंगूर मेला सुरू झाला आहे. याठिकाणी विविध ठिकाणाहून लोक दर्शनासाठी येत असतात. तसेच ज्या भक्तांचे साकडे पूर्ण होतात, त्यांची मुलं नवरात्रभर याठिकाणी लंगूरची वेशभूषा धारण करून दर्शन घेत असतात. हा मेला दहा दिवस असतो.

अमृतसरच्या दुर्गियाना मंदिरात जगप्रसिद्ध लंगूर मेलाला सुरुवात

प्राचीन इतिहास -

लंगूर मेला प्राचीन काळापासून सुरू आहे. श्री रामाने अश्वमेध यज्ञाच्या घोड्यांना सोडलं आणि कुश यांनी घोड्यांना पकडून वडाच्या झाडाला बांधून दिले. त्या युद्धाच्यावेळी भगवान राम यांचे सेवक हनुमान याठिकाणी पोहोचले. लव आणि कुश यांच्यात चर्चा झाली. त्यात हनुमानाला वाटले की, हा भगवान रामाचा मुलगा आहे. मात्र प्रेमापोटी त्यांनी लव आणि कुश यांना काहीच सांगितले नाही. लव आणि कुश यांनी हनुमानाला देखील त्या झाडाला बांधले. ही बातमी सीतेला कळाल्यानंतर सीता त्याठिकाणी पोहोचली. त्यांनी लव आणि कुशला सांगितलं की, हनुमान माझ्या पुत्रासारखा आहे. त्यामुळे त्यांना मुक्त करा. त्यानंतर त्यांना सोडले आणि त्यांची मूर्ती प्रकट झाली. हनुमानाला ज्या वडाच्या वृक्षाला बांधले होते ते वृक्षदेखील आज याठिकाणी आहे.

पुत्रप्राप्तीसाठी साकडं -

ज्याच्या घरी पुत्रप्राप्ती होत नाही, असे लोक याठिकाणी येऊन देवाला साकडं घालतात. वडाच्या झाडाला दौरा बांधून हे साकडं घातलं जाते. त्यानंतर ज्यांना पुत्रप्राप्ती होते, ते नवरात्रीत दहा दिवस हनुमानाच्या मंदिरात लंगूर च्या वेशभूषेत दिवसातून दोन वेळा त्या पुत्राला पाया पडाव्या लागतात. तसेच दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मुलांवर लंगूरचा वेश उतरवला जातो.

ABOUT THE AUTHOR

...view details