महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले; पहिली पूजा पंतप्रधान मोदींच्या वतीने - विश्व प्रसिद्ध भगवान केदारनाथ धाम

विश्व प्रसिद्ध भगवान केदारनाथ धामचे दरवाजे (कपाट) पुढील सहा महिन्यांसाठी विधीपूर्वक पूजा-अर्चा करून आज उघडण्यात आले आहेत. मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर पहिली पूजा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने करण्यात आली.

केदारनाथ
केदारनाथ

By

Published : May 17, 2021, 3:45 PM IST

डेहराडून - उत्तराखंडमधील शंकर महादेवाचे अकरावे ज्योतिर्लिंग आणि विश्व प्रसिद्ध भगवान केदारनाथ धामचे दरवाजे (कपाट) पुढील सहा महिन्यांसाठी विधीपूर्वक पूजा-अर्चा करून आज उघडण्यात आले आहेत. यावेळी मंदिराला 11 क्विंटल फुलांनी सजवण्यात आले होते. पहाटे 3.30 वाजता केदारनाथ धामेचे सचीव पुजारी बागेश लिंग व विद्वान आचार्याकडून देवांचे आवाहन करण्यात आले. कोरोनाचा धोका लक्षात घेता फक्त पुजाऱ्यांनाच मंदिरात प्रवेश असून भाविकांना दर्शन घेण्यास परवानगी देण्यात आली नाही.

केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले...

मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर पहिली पूजा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने करण्यात आली. गुजरातचे उद्योगपती दीपक रावत दरवर्षी दिवाळी आणि दरवाजे उघडण्याच्या मुहुर्तावर पंतप्रधान मोदींच्या नावाने पुजा करतात. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात आले. फक्त पूजा करण्यासाठी मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले आहे. दुसऱ्यांदा भाविकांच्या गैरहजेरीत केदारनाथ धामचे दरवाजे उघडले आहेत.

चारधाम द्वार उघडण्याच्या तिथी..

हिमालयीन परिसरातील बद्रिनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चार मंदिरांचे दर्शन चारधाम यात्रेत असते. युमनोत्रीचे दरवाजे 14 मेला उघडण्यात आले. तर 15 मे ला गंगोत्रीचे दरवाजे उघडण्यात आले. आज केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. तर आता 18 मे ला ब्रदीनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यात येतील. आशआप्रकारे बद्रिनाथ मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर चारही धाम खुले होतील.

हेही वाचा -अपेक्षेपूर्वीच तौक्ते गुजरातच्या हद्दीत होणार दाखल; प्रशासन झाले सज्ज

ABOUT THE AUTHOR

...view details