लखनौै- सरकारी रुग्णालयात माणसांवरच उपचार होतात. मात्र, आग्रामधील जिल्हा रुग्णालयात मूर्तीवर प्लास्टर करण्याची डॉक्टरांवर वेळ आली. कारण, एका पुजाऱ्याने मूर्तीवर प्लास्टर करण्यासाठी गोंधळ घातला होता.
आग्राच्या जिल्हा रुग्णालयात (Agra District Hospital) मंदिराचे पुजारी थेट देवाची मूर्ती घेऊन दाखल झाले. या पुजाऱ्याने रुग्णालयातील डॉक्टरांना कृष्णाच्या मूर्तीच्या तुटलेल्या हातावर शस्त्रक्रिया करण्याची विनंती केली. डॉक्टरांनी विरोध केल्याने पुजारी नाराज झाले. त्यांनी डॉक्टरांच्या समोरच भिंतीवर डोके आपटून घेतले. यावेळी डोके फुटल्याने पुजारी गंभीर जखमी झाले. ही घटना समोर येताच हिंदू संघटनेने मूर्तीच्या हातावर प्लास्टर करण्याची सीएमएस अशोक अग्रवाल यांना विनंती केली. अखेर अग्रवाल यांनी मूर्तीला प्लास्टर केले आहे.
पुजारी लेख सिंह (priest Lekh Singh) म्हणाले, की गेल्या 35 वर्षांपासून लड्डू गोपाळची पुजा करत आहे. शुक्रवारी पहाटे 5 वाजता लड्डू गोपाळ यांची पुजा करताना हात तुटला. सकाळी 8 वाजल्यापासून विविध रुग्णालयात प्लास्टर करण्यासाठी भटकत होतो. मात्र, डॉक्टरांनी त्यांना वेडे म्हणून हाकलून दिले होते. ही बाब समजताच हिंदू महासभेने हस्तक्षेप करत लड्डू गोपाळच्या हातावर प्लास्टर करण्यासाठी पुढाकार घेतला.