दिल्ली - ऑस्कर पुरस्कार २०२२चे तयारी सुरु झाली आहे. सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा 'ऑस्कर पुरस्कार' सोहळ्याकडे मनोरंजनसृष्टीसह सिनेप्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. ( Today Oscars Awards ) हा पुरस्कार कोरोनामुळ दोन वेळा पुढे ढकलण्यात आला होता. अखेर, आज रविवार (२७ मार्च)रोजी 'ऑस्कर पुरस्कार'सोहळा पार पडणार आहे. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये 94 वा 'ऑस्कर पुरस्कार'सोहळा पार पडणार आहे.
'द पॉवर ऑफ डॉग' या सिनेमाला सर्वाधिक नामांकन - ऑस्कर हा जगभरात अत्यंत मानाचा समजला जाणारा पुरस्कार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (Oscar ceremony is taking place today) 'द पॉवर ऑफ डॉग' या सिनेमाला सर्वाधिक नामांकन मिळाले आहेत. तर, भारताच्या 'राइटिंग विथ फायर' या सिनेमाने सर्वोत्कृष्ट माहितीपटाच्या श्रेणीत स्थान मिळवले आहे.
भारतात ऑस्कर कधी आणि कसा पाहाल? -ऑस्कर पुरस्कार सोहळा आज रविवारी (२७ मार्च)रोजी रात्री ८ वाजल्यापासून लॉस एंजेलिसमध्ये सुरु होणार आहे. पण वेळेतील फरकामुळे भारतात सोमवारी (२८ मार्च) पहाटे (५. ३०)वाजल्यापासून हा सोहळा पाहता येणार आहे. हा सोहळा डिस्ने प्लस हॉटस्टार (Disney + Hotstar)वर लाइव्ह पाहता येणार आहे.
लाइव्ह स्ट्रीम संपल्यानंतर तो उपलब्ध असणार - हा सोहळा स्टार वर्ल्ड आणि स्टार मुव्हीजवर सकाळी ६.३० वाजता प्रसारित होईल. तसेच, ऑस्करच्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबतचे लाइव्ह अपडेट देण्यात येणार आहेत. तुम्हाला जरी हा कार्यक्रम पाहता आला नाही तरी (Disney+Hotstar) वर लाइव्ह स्ट्रीम संपल्यानंतर तो उपलब्ध असणार आहे.