मुंबई -राज्यात जून महिन्यामध्ये पाऊस सामान्य राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच यंदा मान्सून सामान्यापेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. यावर्षात साधारण 96 ते 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये सात जूननंतर पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावल्याने पावसाची प्रतिक्षा लांबली आहे.
पुढील पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं भारतीय हवामान विभागाने म्हटलं आहे. तसेच तामिळनाडू, कोकण आणि गोव्याच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. मात्र, विदर्भातील तुुरळक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे.