महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Punjab Government: मान मंत्रिमंडळाचा विस्तार; मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची संख्या झाली 15 - stf findings

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. आम आदमी पक्षाच्या पाच आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

मान मंत्रिमंडळाचा विस्तार
मान मंत्रिमंडळाचा विस्तार

By

Published : Jul 4, 2022, 10:27 PM IST

चंदीगड - पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज सोमवार (दि. 4 जुलै)रोजी त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला, त्यात आम आदमी पक्षाच्या (AAP) पाच आमदारांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. या वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून राज्यात AAP सत्तेवर आल्यानंतर मान यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा हा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आहे. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी सोमवारी संध्याकाळी चंदीगड येथील पंजाब राजभवनाच्या गुरु नानक देव सभागृहात आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

आमदार अनमोल गगन मान यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ - सुनममधून दोन वेळा आमदार राहिलेले अमन अरोरा वगळता इतर चार जण पहिल्यांदाच मंत्री झाले आहेत. अरोरा यांनी सर्वप्रथम शपथ घेतली. त्यांच्या पाठोपाठ डॉ. इंद्रबीर सिंग निज्जर, जे अमृतसर दक्षिण मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांच्यानंतर, गुरू हर सहाय क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे फौजा सिंग सराय, सामनाचे आमदार चेतन सिंग जौरमाजरा आणि खरारचे आमदार अनमोल गगन मान यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची संख्या 15 - मान यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री बनणाऱ्या अनमोल गगन मान या दुसऱ्या महिला आहेत. या सर्वांनी पंजाबी भाषेत शपथ घेतली. पाच नवीन चेहऱ्यांपैकी चार आमदार माळवा विभागातील आणि एक आमदार माढा विभागातील आहेत. आणखी पाच मंत्र्यांची भर पडल्याने मान यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातील मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची संख्या 15 झाली आहे.

मंत्र्यांची कमाल संख्या १८ - विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून 'आप'चे सरकार स्थापन झाल्यानंतर मार्चमध्ये 10 आमदारांना मंत्रीपद देण्यात आले. मात्र, मे महिन्यात आरोग्यमंत्री विजय सिंगला यांची भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आल्याने राज्य सरकारमधील मंत्र्यांची संख्या नऊ झाली. पंजाबमध्ये मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची कमाल संख्या १८ असू शकते. 117 जागांच्या विधानसभेत आम आदमी पक्षाने 92 जागा जिंकून पंजाबमध्ये सत्ता मिळवली आहे.

हेही वाचा -Lalu Prasad Yadav: राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

ABOUT THE AUTHOR

...view details