खम्मम : देव तारी त्याला कोण मारी अशी आपल्याकडे म्हण आहे. त्याचाच प्रत्यय आता तेलंगाणामध्ये आला आहे. ही घटना खम्मम जिल्ह्यातील आहे. तिथे रविवारी रात्री एक दुःखद घटना घडली. पतीबरोबर झालेल्या भांडणानंतर पत्नीने विहिरीत उडी घेतली असे पतीला वाटले. त्यामुळे पतीनेही तिला वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतली. त्याला पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. त्याला पोहायला येत नाही हे माहीत नसलेल्या त्याच्या मित्राने त्याला वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतली. मात्र त्याचाही बुडून मृत्यू झाला. खम्मम जिल्ह्यातील नेलाकोंडापल्ली मंडल येथे रविवारी रात्री ही घटना घडली.
अप्पलानरसिंहपुरम गावात राहणारे कार्लापुडी नागराजू आणि रमाना हे जोडपे रविवारी एका क्षुल्लक कारणावरून भाडले. या भांडणामुळे पत्नी चांगलीच वैतागली. आता मी विहिरीत उडी मारून जीवच देते असे बडबडत ती घराबाहेर पडली. आता दुखावलेलीळे पत्नी रमणा विहिरीत उडी मारून मरेल अशी भीती तिच्या पतीला वाटू लागली. कारण ती रागाने बडबडतच घराबाहेर पडली होती. तिचा पती नागराजू तिच्या मागा मागे गेला पण त्याला ती काही सापडलीच नाही. त्याने पत्नाची खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र खूप वेळ झाला तरी ती काही सापडली नाही. मग त्याला वाटले तिने खरेच विहिरीत उडी मारली असावी. त्यामुळे तिला वाचवण्यासाठी विहीरीत उडी मारायचा त्याने निर्णय घेतला. त्याला पोहता येत नसतानाही नागराजूने तिला वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली.