रायपुर (छत्तीसगड) -राजधानी रायपूरच्या महिला पोलीस ठाण्यात एक अनोखा प्रकार समोर आला आहे. एका महिलेने पतीविरोधात तक्रार केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एफआयआरही नोंदवला आहे. (Complaint of husband in Raipur) महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, "तिचा पती हा घृणास्पद स्वभावाचा आहे. तो इतर महिलांशी संबंध शोधत असतो. तसेच तिच्यावर असभ्य कमेंट करतो." महिलेने तिच्या पतीवर हुंडा, मारहाण आणि गर्भपातासाठी छळ केल्याचेही गंभीर आरोप आहेत. यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.
पती म्हणत होता तू षंढ दिसतेस - रायपूरच्या पुरानी बस्ती परिसरात राहणाऱ्या एका ३० वर्षीय तरुणीने तक्रारीत म्हटले आहे की, "तिचे २०१२ मध्ये लग्न झाले होते. लग्न झाल्यापासून पतीचे वागणे चांगले नव्हते. अनेकदा शिवीगाळ करत असे. रूप आणि पोत बरोबर नाही असे सांगून टोमणे मारतात. म्हणतात, की तुझा चेहरा नपुंसकासारखा आहे. तुझ्या वडिलांच्या सांगण्यावरून लग्न केले. नाहीतर तुझ्यासारख्या मुलीशी कोण लग्न करेल, असेही तो म्हणतो.