श्रीनगर - (जम्मू-काश्मीर) - मशीद आणि मंदिराच्या नावावर लोकांची दिशाभूल करून भाजपला खऱ्या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष वळवायचे आहे. वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी प्रकरणातील हिंदूंच्या बाजूच्या याचिकेला परवानगी दिल्यानंतर पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाने 1947 नंतर सर्व धार्मिक स्थळांची स्थिती यथास्थित ठेवण्याचा निर्णय घेतला होता. ( Mehbooba Mufti On Gyanvapi case ) मात्र, बेरोजगारी, गरिबी, महागाई दूर करण्यात भाजपला अपयश आले आहे. म्हणून ते मशीद आणि मंदिराच्या मुद्द्यावर लोकांना गोंधळात टाकत आहेत, जेणेकरून लोक खऱ्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करू शकणार नाहीत अस त्या म्हणाल्या आहेत.
Gyanvapi: ज्ञानवापी खटल्याच्या निकालावर प्रतिक्रिया; पाहा काय म्हणाल्या मेहबुबा मुफ्ती - Mehbooba Mufti On Gyanvapi case
पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी ज्ञानवापी खटल्यातील वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर बोलताना त्या म्हणाल्या, भाजप बेरोजगारी, गरिबी आणि महागाई दूर करण्यात अपयशी ठरली आहे. (Gyanvapi) त्यामुळे मशीद-मंदिराच्या मुद्द्यावरून लोकांमध्ये गोंधळ निर्माण करत आहे.
मुस्लिम बाजूची याचिका फेटाळून लावली - ज्ञानवापी मशीद प्रकरणातील न्यायालयाचा निर्णय भाजपच्या या विचारसरणीचे समर्थन करतो. विशेष म्हणजे, सोमवारी ज्ञानवापी प्रकरणात, वाराणसी जिल्हा न्यायालयाने हे प्रकरण कायम ठेवण्यायोग्य असल्याचे सांगितले होते. तसेच, या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 सप्टेंबर रोजी होईल असही न्यायालयाने सांगितले आहे. या खटल्यात हिंदूची बाजू मांडणारे वकील विष्णू शंकर जैन म्हणाले की, न्यायालयाने हे प्रकरण दखलपात्र असल्याचे सांगत मुस्लिम बाजूची याचिका फेटाळून लावली.
संबंधित याचिका कायम ठेवण्यायोग्य - ज्ञानवापी शृंगार गौरी प्रकरणाची सुनावणी सुरूच राहील, असे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. शृंगार गौरीशी संबंधित याचिका कायम ठेवण्यायोग्य असल्याचे जिल्हा न्यायालयाने म्हटले आहे. 27 पानांच्या निकालात, जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयाने सांगितले की, पुराव्याच्या आधारे आतापर्यंत खटला चालवण्यायोग्य मानला जात आहे. निकालादरम्यान शृंगार गौरीच्या पूजेच्या परवानगीसाठी याचिका दाखल करणाऱ्या मंजू व्यास, लक्ष्मी देवी आणि रेखा पाठक याही कोर्टात हजर होत्या.