सुरत - ग्रीष्मा वेकारिया हत्येप्रकरणी आज गुजरात न्यायालयाने निकाल ( Grishma Vekaria murder case ) दिला आहे. आरोपी फेनिल गोयानी ( death penalty Fenil Goyani ) याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने श्लोक बोलून शिक्षा सुनावली होती. ही हत्या पूर्वनियोजित आणि कट रचल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला.
ग्रीष्मा वेकारिया हत्येप्रकरणी निकालात न्यायालयाने ( verdict in the Grishma Vekaria murder ) निरीक्षणे नोंदविली आहेत. न्यायालयाने म्हटले, की ग्रीष्मा असहाय्य आणि घाबरलेली होती. आरोपींनी ग्रीष्माच्या काका आणि भावावरही हल्ला केला. मृत ग्रीष्मा निशस्त्र होती. तिची निर्घृण हत्या ( brutal murder of Grishma Vekaria ) करण्यात आली. आरोपीला ग्रीष्माचे रडणे दिसले नाही. तिची दया आली नाही, असे न्यायालयाने निकालात म्हटले.
आरोपीच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप नव्हता- न्यायालयाने म्हटले, कदाचित लोकांनी पहिल्यांदाच जिवंत हत्येचे दृश्य पाहिले असेल. आरोपीला या घृणास्पद कृत्याबद्दल कोणताही पश्चात्ताप केला नाही. न्यायालयाने सुनावणीदरम्यान दहशतवादी अजमल कसाबचाही उल्लेख केला. या प्रकरणात पुरावे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. आरोपीने सराईत गुन्हेगारांसारखाच गुन्हा केला आहे.