कोलकाता -पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज चौथ्या टप्प्यात मतदान सुरू आहे. तीसऱ्या टप्प्यात कोलकातामधील टॉलीगंज विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार बाबुल सुप्रियो रिंगणात आहेत. तर त्यांच्याविरोधात टीएमसीकडून अरूप विश्वास मैदानात आहेत. पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जी यांची सत्ता हटवणे हेच आव्हान आहे, असे यावेळी माध्यमांशी बोलताना बाबुल सुप्रियो म्हणाले. अरुप विश्वास ममता बॅनर्जी यांचे राईट हॅन्ड आहेत. त्यामुळे येथील दहशतीचे वातावरण बदलण्याचे एक आव्हान आहे, असे ते म्हणाले.
बाबुल सुप्रियो माध्यमांशी संवाद साधताना... बाबुल सुप्रियो यांचा मुकाबला अरुप विश्वास यांच्यासोबत आहे. पक्षाच्या पोलिंग एजेंटला एंट्री देण्यात येत नसल्याने भारती बालिका विद्यालयातील मतदान केंद्रात बाबुल सुप्रियो पोहचले. एजेंटजवळ आयडी आहे. मात्र, पीठासीन अधिकारी द्वारा प्रवेश देण्यात येत नव्हता, असे सुप्रियो यांनी सांगितले.
चौथ्या टप्प्यात 44 जागांसाठी मतदानाला -
पश्चिम बंगालमध्ये एकूण 8 टप्प्यांमध्ये मतदान होत आहे. चौथ्या टप्प्यात 5 जिल्ह्यांतील एकूण 44 जागांसाठी मतदान होत आहे. यापैकी अनुसूचित जातीसाठी 8 आणि अनुसूचित जमातींसाठी 3 जागा राखीव आहेत. 44 जागांवर एकूण 373 उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. एकूण 1,15,81,022 मतदार मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी पात्र आहेत. यात 58,82,514 पुरुष आणि 56,98,218 महिलांचा समावेश आहे. याशिवाय 290 तृतीयपंथी मतदारही मतदानासाठी पात्र आहेत. चौथ्या टप्प्यासाठी एकूण 15940 मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी सीआरपीएफच्या 789 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
दिग्गज नेत्यांच्या राजकीय भवितव्याचा आज फैसला दिग्गजांचे भवितव्य होणार मतपेटीत बंद -
चौथ्या टप्प्यात अनेक दिग्गजही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो, सीपीआयचे देवदूत घोष, पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी तसेच अरुप बिस्वास अशा दिग्गज नेत्यांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.
हेही वाचा -पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक : चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू