महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Aunt Ran Away : अजब प्रेम... भाच्याच्या प्रेमात पडली मावशी ! सहा मुलांसह पतीला सोडून ठोकली धूम - अजब प्रेम

6 मुलांची आई पती आणि मुलांना सोडून प्रियकरासह पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेचा पती आणि मुलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही महिला ज्या व्यक्तीसोबत पळून गेली ती व्यक्ती नात्यात भाच्चा असल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. (Aunt Ran Away)

Aunt Ran Away
भाच्या सोबत मावशी पळाली

By

Published : Mar 22, 2023, 3:42 PM IST

सागर: प्रेम आंधळं असतं आणि प्रेमात सगळं न्याय्य असतं असं म्हंटलं जात... प्रेमाला ना वयाचे बंधन असते ना नात्याची भिंत त्याच्या आडवी येते. असे म्हणण्याचे कारण म्हणजे सागर जिल्ह्यातील देवरी पोलीस ठाणे परीसरातील चीमाधना गावात असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ज्यात बेपत्ता आईवर तिची मुले आणि पतीने आरोप केला आहे की, ती तिच्या भाच्या सोबत फरार झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा नोंदवला असून पुढिल तपास सुरु आहे. मात्र जवळच्याच नात्यांमधली थक्क करणारी ही प्रेमकहाणी सध्या चर्चेत आहे.

6 मुलांची आई : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चीमाधना गावातील एक व्यक्तीने पोलिस ठाण्यात येऊन पत्नी पळून गेल्याची तक्रार दाखल केली. 14 फेब्रुवारीला ती तिच्या भाच्यासोबत पळून गेल्याचे म्हणले आहे. एवढेच नाही तर पत्नीने घरातून ६० हजार रुपयेही नेल्याचे म्हणले आहे. तीच्या पतीने तक्रारीत म्हटले आहे की, माझी पत्नी 14 फेब्रुवारीपासून बेपत्ता आहे. यापूर्वी आम्हाला माहित नव्हते, परंतु ती तिचा भाचा सतीशसह ती पळून गेल्याचे समोर आले आहे. तिच्यासोबत सतीश नावाचा मुलगा आहे. आणि सोनू. आणि ते तिघेही सध्या एकत्र आहेत. दोन्ही मुले समनापूर गावातील आहेत. आम्ही पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, पण पोलिस माझी पत्नी शोधण्यात मला मदत करत नाहीत. त्याच प्रकरणात, मुलाने सांगितले की माझी आई पळून गेली, तो सतीश तिच्या सख्ख्या बहिणीचा मुलगा आहे. या महिलेला 6 मुले असून पती आणि मुलगा दोघे मिळून महिलेच्या पलायनाची तक्रार लिहिण्यासाठी पोहोचले होते.

पोलीस तपास सुरु: या प्रकरणी पोलीस ठाणे प्रभारी उपमा सिंह यांनी म्हणले आहे की, या प्रकरणी 14 फेब्रुवारी रोजी महिलेच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली, तक्रार दाखल करताना महिलेच्या पतीने ना कोणताच पत्ता दिला, ना मोबाईल नंबर. त्यामुळे त्यांना पुन्हा पोलिसांनी बोलावले. आता महिलेच्या पतीने सांगितले की, ती तिचा भाच्चा आणि एका मित्रासह पळून गेली आहे. सध्या या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून आम्ही महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत. याप्रकरणी महिलेच्या पतीने जी काही माहिती दिली आहे, त्या आधारे शोधण्याचाही प्रयत्न सुरू आहे.

हेही वाचा : Children Drowned in Lake : खेळता-खेळता शेततळ्यातील पाण्यात उतरले; बुडून तीन चिमुकल्यांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details