श्रीनगर Terrorist Encounter In JK : जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सातत्यानं घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांची संख्या जास्त आहे. मात्र भारतीय सैन्य दलानं संयुक्त काराई करत एका वर्षात तब्बल 31 दहशतवाद्याचा खात्मा केल्याची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी बुधवारी दिली आहे. जम्मू काश्मीर पोलीस विविध सुरक्षा दलांसोबत संयुक्त कारवाईत सहभागी होत आहेत. पोलिसांनी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी विविध ऑपरेशन्स राबवले आहेत. यात आतापर्यंत 31 दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात यश आल्याचं या अधिकाऱ्यानं सांगितलं.
संयुक्त कारवाईत आतापर्यंत मारले 31 दहशतवादी :जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा डाव उधळण्यासाठी भारतीय सैन्य दलातील जवान सतर्क असतात. त्यांना जम्मू काश्मीर पोलीस दलाचीही मोठी साथ मिळत आहे. भारतीय सैन्य दल, पोलीस, एसएसबी, सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) यांनी जम्मू काश्मीरमध्ये संयुक्त कारवाई केली. 2023 या वर्षात आतापर्यंत काश्मीरमध्ये संयुक्त कारवाईत एकूण 31 दहशतवादी मारले गेल्याची माहिती या पोलीस अधिकाऱ्यानं दिली आहे.
जम्मू काश्मीर पोलिसांची अशी आहे आकडेवारी :जम्मू-काश्मीर पोलीस दल, भारतीय सैन्य दल आणि सशस्त्र सीमा दल यांनी ही संयुक्त कारवाई केली. या संयुक्त कारवाईत एक दहशतवादी ठार करण्यात आला. जम्मू-काश्मीर पोलीस, भारतीय सैन्य दल आणि सीमा सुरक्षा दलाच्या संयुक्त कारवाईत दोन दहशतवादी ठार करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.