महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा भारतीय सैन्याच्या गाडीवर हल्ला; 3 जवान हुतात्मा - पुंछमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला

Terrorist Attack on Military Vehicles : जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याच्या दोन वाहनांवर हल्ला केला. या घटनेत तीन जवान हुतात्मा (Three Army Personnel Killed) झाले आहेत. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून, शोध मोहीम सुरू केली आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 21, 2023, 7:40 PM IST

Updated : Dec 21, 2023, 8:28 PM IST

दहशतवाद्यांचा भारतीय सैन्याच्या गाडीवर हल्ला

जम्मू Terrorist Attack on Military Vehicles : जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात गुरुवारी दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याच्या दोन वाहनांवर हल्ला (Three Army Personnel Killed) केला. यात तीन जवान हुतात्मा झाले आहेत. तसेच या घटनेत तीन जवान जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. थानामंडी-सुरनकोट रोडवर असलेल्या सावनी भागात हा हल्ला झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

सैन्याच्या वाहनावर हल्ला : सैन्याचे वाहन बफलियाज येथून सैनिकांना घेऊन जात होते. बुफलियाजमध्ये बुधवारपासून दहशतवाद्यांविरोधात घेराव आणि शोध मोहीम सुरू आहे. या भागातून वाहन जात असताना दहशतवाद्यांनी वाहनावर गोळीबार केला. यामध्ये तीन जवान हुतात्मा झाले आहेत. या घटनेत तीन जवान जखमी झाल्याची माहिती सैन्यातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच जखमी झालेल्या जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दहशतवादी अटकेत : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात आत्मसमर्पण करणाऱ्या आणि गेल्या १८ वर्षांपासून फरार असलेल्या एका दहशतवाद्याला गुरुवारी अटक करण्यात आली. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, परवेझ अहमद उर्फ ​​हरिस नावाच्या आत्मसमर्पण केलेल्या दहशतवाद्याला किश्तवाडमध्ये छापेमारी दरम्यान अटक करण्यात आली.

एप्रिल महिन्यात झाला होता असाच हल्ला : मुसळधार पाऊस आणि दृष्यमानता कमी झाल्याचा फायदा घेत दहशतवाद्यांनी वाहनावर केलेल्या हल्ल्यात भारतीय सैन्याचे पाच जवान हुतात्मा झाले होते. यात एक जवान जखमी झाला होता. भारतीय सैन्याच्या नॉर्दन कमांड मुख्यालयानं जारी केलेल्या निवेदनानुसार, 21 एप्रिलच्या दुपारी तीनच्या सुमारास राजौरी विभागात भिंबर गली ते पूँछ मार्गावर दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याच्या वाहनावर बेछूट गोळीबार केला. यावेळी मुसळधार पाऊस पडत असल्यानं दृष्यमानता कमी होती. दहशतवाद्यांनी टाकलेल्या ग्रेनेडमुळं वाहनाने पेट घेतला. यामध्ये दहशतवादविरोधी कारवाईसाठी पाठविण्यात आलेले राष्ट्रीय रायफल्स युनिटचे पाच जवान हुतात्मा झाले होते.

हेही वाचा -

  1. आयसिस दहशतवादी संघटनेच्या ७ जणांना भिवंडीतून अटक; दहशतवादी संघटनेच्या संशयितांची संख्या अकरावर
  2. कुख्यात दहशतवादी रिंदाच्या वडील आणि भावाला अटक
Last Updated : Dec 21, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details