तिरुवनंतपुरम ( केरळ ) : गुरुवारी (दि. ३० ) रात्री सत्ताधारी सीपीआय(एम) च्या राज्य मुख्यालयावर (एकेजी सेंटर) अज्ञात व्यक्तीने स्फोटक पदार्थ फेकल्यामुळे ( explosives hurled at CPIM headquarters ) केरळमध्ये तणाव निर्माण ( Tension grips Kerala ) झाला. पोलिसांनी सांगितले की, राजधानी शहराच्या मध्यभागी असलेल्या AKG केंद्रावर रात्री 11.30 च्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या व्यक्तीने स्फोटक पदार्थ फेकले. घटनास्थळी पोहोचलेल्या सीपीआय(एम) नेत्यांनी हा ‘बॉम्ब हल्ला’ असल्याचा आरोप केला. पक्षाच्या काही नेत्यांनी, जे एकेजी सेंटरमध्ये थांबले होते, त्यांनी सांगितले की त्यांनी इमारतीच्या बाहेर एक शक्तिशाली स्फोट ऐकला.
घटना सीसीटीव्हीत कैद :पोलिसांना ताबडतोब सतर्क करण्यात आले आणि उच्च अधिकार्यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची छाननी केली. बॉम्बशोधक पथकानेही घटनास्थळाची पाहणी केली. सीपीआय(एम) ने AKG सेंटरच्या अधिकृत मीडिया ग्रुपद्वारे जारी केलेल्या सीसीटीव्ही व्हिज्युअलमध्ये एक व्यक्ती मोटारसायकलवरून घटनास्थळी पोहोचताना आणि इमारतीवर "बॉम्ब" फेकून घटनास्थळावरून पळून जात असल्याचे दिसले. स्फोटक AKG केंद्राच्या दगडी भिंतीवर आदळले. शेजारी राहणारे वरिष्ठ सीपीआय (एम) नेते आणि एलडीएफचे निमंत्रक ई पी जयराजन यांनी यामागे काँग्रेस असल्याचा आरोप केला आणि सीपीआय (एम) कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.