महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Bharat Rashtra Samithi : तेलंगणा राष्ट्र समितीचे नाव आता भारत राष्ट्र समिती, निवडणूक आयोगाने दिली मान्यता

तेलंगणा भवन येथे पक्षाच्या ध्वजाचे अनावरण झाले. त्यानंतर केसीआर यांनी शुभ मुहूर्तानुसार दुपारी 1.20 वाजता निवडणूक आयोगाने पाठवलेल्या पत्रावर स्वाक्षरी केली. यानंतर भारत राष्ट्र समिती अस्तित्वात आली.(KCR launches Bharat Rashtra Samithi). (Bharat Rashtra Samithi as national party).

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Dec 9, 2022, 4:04 PM IST

हैदराबाद : देशाच्या राजकीय पटलावर एका नव्या राजकीय पक्षाचा उदय झाला आहे. (Bharat Rashtra Samithi as national party). तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या नेतृत्वात भारत राष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली आहे. (KCR launches Bharat Rashtra Samithi). केंद्रीय निवडणूक आयोगाने तेलंगणा राष्ट्र समितीचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती (BRS) करण्याची परवानगी दिली आहे.

केसीआर यांनी पत्रावर स्वाक्षरी केली : तेलंगणा भवन येथे केसीआर यांनी प्रथम विशेष पूजा केली. त्यानंतर त्यांनी पक्षाच्या ध्वजाचे अनावरण केले. त्यानंतर केसीआर यांनी शुभ मुहूर्तानुसार दुपारी 1.20 वाजता निवडणूक आयोगाने पाठवलेल्या पत्रावर स्वाक्षरी केली. यानंतर भारत राष्ट्र समिती अस्तित्वात आली. केसीआर यांनी स्वाक्षरी केलेले पत्र अधिकृतपणे निवडणूक आयोगाला पाठवले जाईल.

फटाके फोडून आनंद साजरा : जेडीएस नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी तसेच प्रसिद्ध चित्रपट अभिनेते प्रकाशराज यांनी केसीआर यांना भारत राष्ट्र समितीच्या स्थापनेबद्दल शुभेच्छा दिल्या. उद्घाटन सोहळ्यात अनेक मंत्री, खासदार, आमदार, आमदार आणि लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. यानिमित्त तेलंगणा भवनात जल्लोषाचे वातावरण होते. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला.

ABOUT THE AUTHOR

...view details