चेन्नई : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी दहा दिवसांपेक्षाही कमी काळ राहिला आहे. यातच द्रमुकचे वरिष्ठ नेते ई.व्ही.वेलू यांच्या संपत्तीवर प्राप्तीकर विभागाने छापे टाकले आहेत. वेलूंच्या चेन्नईतील घरासह १८ ठिकाणच्या संपत्तीवर हे छापे मारण्यात आले. विरोधक सध्या या कारवाईचा निषेध करत आहेत.
वेलूंचे घर, शैक्षणिक संस्था आणि ट्रस्टची छाननी सध्या करण्यात येत आहे. यासोबतच, अरुणाई अभियांत्रिकी महाविद्यालय, कंबन कला व शास्त्र महाविद्यालय, जीवा वेलू इंटरनॅशनल स्कूल आणि तिरुवन्नामलाईमधील वैद्यकीय महाविद्यालयावरही छापा टाकण्यात आला आहे. तिरुवन्नामलाईमध्ये द्रमुककडून उमेदवार म्हणून वेलू यांचे नाव पुढे करण्यात आले होते. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष स्टॅलिन हे वेलू यांचा मोठ्या प्रमाणात प्रचार करत होते.