नवी दिल्ली - अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय संरक्षण दल आणि सुरक्षा दलाचा (ANDSF) तालिबानी दहशतवाद्यांसमोर टिकाव लागला नाही. तालिबानी दहशतवाद्यांचे आक्रमण सुरू असताना अफगाणिस्तानच्या सैन्यदल आणि पोलीस दलाने केवळ बघ्याची भूमिका घेतली. तालिबानी दहशतवाद्यांनी अमेरिकन बनावटीच्या सैन्यदलाची वाहने ताब्यात घेतानाही अफगाणिस्तानचे सैन्यदल काहीही करू शकले नाही. कारण, तालिबानी दहशतवाद्यांचे रेड युनिट!
सुत्राच्या माहितीनुसार तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानचे विविध प्रांत घेण्यासाठी त्यांच्या खास सुरक्षा दलाला सर्वत्र तैनात केले होते. सारा खेता (पश्तू भाषेत रेड युनिट) असे सुरक्षा दलाचे नाव आहे. हे सुरक्षा दल पायदळात लढणाऱ्या तालिबानी योद्धांकरिता महत्त्वाचा हिस्सा ठरले आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी प्रोपागंडा राबवित अफगाणिस्तानच्या तरुणांना रेड युनिटमध्ये समावेश करून घेतले आहे. रेड युनिटमधील तालिबानी योद्धे हे विशेष प्रशिक्षित, वाहनांनी सुसज्ज, अधिक शस्त्रास्त्रे असलेले आणि सैन्यदलाची उपकरणे बाळगलेली असतात.
हेही वाचा-अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा, 220 भारतीयांना घेऊन विमान दिल्लीत दाखल
असे असतात रेड युनिटमधील दहशतवादी
रेड युनिटमधील तालिबानी योद्धांच्या हातामध्ये लाल बँड असते. तर हे योद्धे पाकिस्तानमध्ये तयार झालेले चिलखत अंगावर घालतात. त्यांच्याकडे एलबो गार्ड, नी पॅड्स, स्पेशल ग्लोव्हज आणि चेस्ट रिग्ज असतात. विशेष म्हणजे त्यांच्या कालाश्निकोव्ह रायफल, टोकारेव्ह पिस्तूल, लाईट मशिन गन्स, रात्री दिसू शकणारे साधणे आणि लेसर पाँईटर असतात. त्यांना अँटी एअरक्राफ्ट गनही वापरता येतात. रेड युनिटकडून वापरण्यात येणाऱया मोहिमांमध्ये स्निपर्स आणि कमांडो घेतले जातात. तर स्थानिक मोहिमांमध्ये तालिबानी योद्धे (सैनिक) सहभाग घेतात. रेड युनिटमधील दहशतवाद्यांना कुठेही तैनात करता येईल, असे प्रशिक्षण दिले जाते. ते वेगाने स्थलांतरण करू शकतात, हे त्यांचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
हेही वाचा-काबुल विमानतळावर दुर्घटना; अफगाणिस्तानातून पळण्याच्या प्रयत्नात 5 जणांचा मृत्यू
रेड युनिटने असा वाढविला प्रभाव-