हैदराबाद - सोशल मीडियावर एका व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तालिबानी सैन्याने अफगाणिस्तानच्या संसदेत प्रवेश केल्याचे दिसत आहे. तालिबानी सैन्य संसदेच्या इमारतीत शस्त्रे वापरताना या व्हिडीओतून दिसत आहे. दरम्यान, अफगाण नेते अशरफ गणी यांनी संसदेचे संयुक्त सत्र आयोजित केले होते. तेंव्हाचा हा व्हिडीओ असल्याचे बोलले जात आहे. ही इमारत भारताने बांधली आहे.
मोदींनी केले होते संसदेच उद्घाटन -
भारताने 2009 मध्येराजधानी काबूलमध्ये 90 दशलक्ष डॉलर्स खर्चून ही इमारत बांधली होती. ही इमारत 100 एकर जागेवर बांधण्यात आली होती.2015 मध्ये या इमारतीचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.तसेच त्यावेळी मोदींनी अफगाणिस्थान संसदेच्या दोन्ही सभागृहांनाही संबोधित केले होते. ही इमारत भारत-अफगाणिस्थानच्या मैत्रीची साक्ष असल्याचे अफगाणिस्थानचे पंतप्रधान अशरफ गणी यांनी म्हटेल होते. दरम्यान, 2009 मध्ये या इमारतीचे बांधकाम सुरु करण्यात आले होते. तर 2014मध्ये ते पूर्ण करण्यात आले होते.
तालिबानने प्रमुख शहरांवर मिळवले नियंत्रण -