महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 10, 2022, 10:43 AM IST

ETV Bharat / bharat

Sabudana kheer : उपवासाला बनवल्या जाणाऱ्या साबुदाण्याची अशीही बनते खीर!

साबुदाणापासून खीर कशी बनवावी हे जाणून घेणार ( How to make Sabudana kheer ) आहोत. ती आपण उपवासालाही साबुदाणा खीर खाऊ ( Fasting Sabudana kheer) शकतो. जर तुम्ही उपवासादिवशी खिचडी आणि इतर पदार्थ खाऊन थकला असचाल तर ही रेसिपी नक्की करा.

Sabudana kheer
साबुदाणा खीर

नवी दिल्ली :खीर हा सर्वांना आवडणारा पदार्थ आहे. मग ती कोणत्याही प्रकारची असो. आज आपण साबुदाणापासून खीर कशी बनवावी हे जाणून घेणार ( How to make Sabudana kheer ) आहोत. ती आपण उपवासालाही साबुदाणा खीर खाऊ ( Fasting Sabudana kheer) शकतो. जर तुम्ही उपवासादिवशी खिचडी आणि इतर पदार्थ खाऊन थकला असचाल तर ही रेसिपी नक्की करा.

साबुदाणा खीर साहित्य : उपवासादिवशी गोड पदार्थ खायला सर्वांना आवडतात. खीर साबुदाणा खीर बनवण्यासाठी 1/4 कप साबुदाणा, 4 टेबलस्पून साखर, 1-लिटर दूध, 4 हिरव्या वेलची, 1 टेबलस्पून तूप , 10-12 काजू आणि बदाम गार्निशिंगसाठी ( Sabudana Kheer Ingredient ). अगदी कमी कालावधील साबुदाणा खीर बनते.

साबुदाणा खीर पाककृती : 3-4 तास साबुदाणा भिजवा. साबुदाणा चांगला भिजला की. एक वाडगा घ्या. त्यात दूध, वेलची आणि साखर घाला. मायक्रोवेव्हमध्ये 2 मिनिटे दूध हिट करा. दुधाचे मिश्रण काढून त्यात भिजवलेला साबुदाणा आणि तूप घाला. मायक्रोवेव्हमध्ये आणखी 5 मिनिटे पुन्हा साबुदाणा गरम करा. वाटी काढा नंतर खीरीमध्ये काजू आणि बदाम घाला. तुम्ही ते गरम सर्व्ह करू शकता नाहीतर खोलीच्या तपमानावर मिश्रण थंड होऊ देऊ शकता. १ तासासाठी रेफ्रिजरेटरमध्ये खीर ठेवा! थंडगार साबुदाणा खीर सर्व्ह करा. बनवण्यासाठी अगदी सोपी असल्याने घरातील कोणताही सदस्य हा पदार्थ नक्की बनवू शकतो.

ABOUT THE AUTHOR

...view details