नवी दिल्ली -परदेशात भारतीय संस्कृतीचा सुगंध पसरविणारे थोर विचारवंत, युवकांचे प्रेरणा स्थान असे स्वामी विवेकानंद यांची आज पुण्यतिथी आहे. उठा, जागे व्हा आणि आपण आपले लक्ष्य साध्य करेपर्यंत थांबू नका. जीवनाचा हा मंत्र स्वामी विवेकानंदांनी जगाला दिला होता. त्याची ओळख केवळ अध्यात्मिक गुरुची नव्हती, तर त्यांचे आयुष्य भारतीय संस्कृतीने व्यापलेले होते.
स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांच्या घरातील नाव नरेंद्र दत्त होते. ते लहानपणापासूनच गुणवंत विद्यार्थी होते. जीवनाशी संबंधित रहस्ये जाणून घेण्यात त्यांना रस होता. 1871 मध्ये वयाच्या अवघ्या वयाच्या 8 व्या वर्षी त्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर महानगर संस्थेतून शिक्षण घेतले. तर महाविद्यालयीन शिक्षण प्रेसिडेन्सी कॉलेजमधून पूर्ण केले. अभ्यासाबरोबरच त्यांना खेळामध्येही रस होता.
रामकृष्ण परमहंस त्यांचे गुरु होते. 1881 मध्ये दक्षिणेश्वर मंदिरात या दोघांची प्रथम भेट झाली. रामकृष्ण परमहंसांचा स्वामी विवेकानंद यांच्यावर फार प्रभाव पडला. 1893 मध्ये शिकागो येथे जागतिक धर्मपरिषदेत बोलताना विवेकानंद यांनी वेदांत तत्त्वज्ञान पाश्चिमात्य देशांसमोर आणले आणि हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले. या धर्म संसदेत भाषण केल्यानंतर ते प्रसिद्ध झाले. राजा अजितसिंग खेत्री यांनी 10 मे 1893 रोजी स्वामीजींना 'विवेकानंद' असे नाव दिले. 1902 मध्ये पश्चिम बंगालमधील बेलूर मठात विवेकानंद यांचे निधन झाले. बेलूर हे रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनचे मुख्यालय आहे.
स्वामी विवेकानंदांचे विचार -
- व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसायला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर असण्यात आणि सुंदर दिसण्यात खूप फरक असतो.
- स्वतःला परिस्तिथीचे गुलाम समजू नका तुम्ही स्वतः चे भाग्यविधाते आहात.
- सर्वात मोठे पाप म्हणजे स्वतःला अशक्त समजणे.
- सत्य हजार मार्गांनी सांगितले जाऊ शकते, परंतु प्रत्येक सत्य असेल.
- आपल्याला अशा शिक्षणपद्धतीची गरज आहे जे काळाला अनुसरून असेल.
- मन आणि मेंदूच्या द्वंद्वात नेहमी मनाचंच ऐका.
- पावित्र्य, धैर्य आणि दृढ़ता, या तिन्ही गोष्टी यशासाठी आवश्यक आहेत.
- मनुष्यसेवा हीच देवाची सेवा आहे.
- संघर्ष करणं जितकं कठीण असेल तितकीच तुमचं यश शानदार असेल.
- शक्यतेची सीमा जाणून घेण्याचा साठी अशक्यतेच्या पुढे निघून जायला हवे.