कोलकाता -भारतीय जनता पक्षाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी शुक्रवारी नंदीग्राम मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. अधिकारी यांनी नंदीग्राममधील मंदिरात प्रार्थना केली. त्यानंतर त्यांनी एका सभेला संबोधीत केले. राज्यात बेरोजगारी वाढली आहे. राज्यात बदल गरजेचा असून आपल्याला तृणमूल काँग्रेसला सत्तेतून हकलून लावायचे आहे, असे ते म्हणाले.
मला जनतेने आशिर्वाद दिला आहे. भाजपाला बंगालवासी समर्थन देतील आणि राज्यात बदल घडवतील, असा विश्वास आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने 18 जागा जिंकल्या होत्या. यावेळी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा बहूमताने सरकार स्थापन करेल, असेही ते म्हणाले.
बंगालच्या विधानसभा निवडणुकीत नंदिग्राम मतदारसंघात ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भारतीय जनता पार्टीने विद्यमान आमदार सुवेंदू अधिकारी यांना उमेदवारी दिली. हा मतदारसंघ सुवेंदू अधिकारी यांचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने आता येथे ममता बॅनर्जी विरुद्ध सुवेंदू अधिकारी यांच्यात थेट लढत होत आहे. तृणमूल काँग्रेस सरकारमधील माजी मंत्री असलेले अधिकारी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भाजपामध्ये दाखल होते. 10 मार्च रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नंदीग्राम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. बॅनर्जी आतापर्यंत भवानीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत होते.
भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना -