महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Darbhanga Woman Beaten : जादूटोण्याच्या संशयावरुन महिलेला विवस्त्र करून बेदम मारहाण

दरभंगा (Darbhanga) येथील सकतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, गावकऱ्यांनी एका महिलेवर जादू टोण्याचा संशय (suspicion of witchcraft) घेऊन बेदम मारहाण (Villagers brutally beat up a woman) केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर ही बाब समोर आली. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Viral Video
ग्रामस्थांनी महिलेला केली बेदम मारहाण

By

Published : Sep 30, 2022, 6:24 PM IST

Updated : Sep 30, 2022, 11:00 PM IST

दरभंगाःबिहारमधील दरभंगामध्ये (Darbhanga) अंधश्रद्धेच्या (suspicion of witchcraft) नावाखाली अडीच वर्षाच्या चिमुरडीचा बळी (sacrificed two and half year old in Darbhanga) दिल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. आरोपी महिलेच्या घरातून मुलाचा मृतदेह सापडला आहे. त्यानंतर जमावाने आरोपी महिलेला घरातून ओढत नेले आणि मारहाण (Villagers brutally beat up a woman) केली. ग्रामस्थांचे समाधान न झाल्याने खांबाला दोरीने बांधून विवस्त्र करून बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे.

ही वार्ता परिसरात आगीसारखी पसरली : साकतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेरपूर नारायणपूर येथील दर्गा टोला येथे सोमवारपासून बेपत्ता असलेल्या अडीच वर्षाच्या चिमुकलीचा मृतदेह मंगळवारी आढळून आला. घटनेची माहिती परिसरात आगीसारखी पसरली. काही वेळातच शेकडो लोक तिथे जमा झाले. शेजारच्या एका महिलेने जादू टोना करून मुलीची हत्या केल्याचा आरोप होता. त्यानंतर संतप्त झालेल्या लोकांनी महिलेला बेदम मारहाण केली.

महिलेला मारहाण करतांना ग्रामस्थ

पेट्रोल शिंपडून महिलेला जाळण्याचा प्रयत्न : माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी कशीतरी संशयित महीलेची लोकांच्या तावडीतून सुटका करून; तिला उपचारासाठी डीएमसीएचमध्ये पाठवले.लोकांचा रोष इतका तीव्र होता की, महिलेवर पेट्रोल शिंपडून तिला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे महिलेचा जीव वाचला.

आरोपीच्या घराजवळ सापडले मुल :याघटनेच्या संदर्भात असे सांगितले जात आहे की, गुलबिया देवी व श्याम चौपालयांचा अडीच वर्षांचा मुलगा आयुष हा सकतपूर पोलीस स्टेशन हद्दीतील शेरपूर नारायणपूर येथील दर्गा टोला येथुन सोमवारी पहाटे १ वाजता बेपत्ता झाला होता. खूप शोधाशोध करूनही मुलाचा सुगावा लागला नाही. त्यानंतर घराशेजारीच अर्धवट बांधलेल्या घरात मुलाचा मृतदेह पडून असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सर्वांनी घटनास्थळ गाठून मुलाचा मृतदेह पडल्याचे पाहिले. दरम्यान मृतदेहाभोवती प्रचंड गर्दी जमली होती.

काय म्हणाले वरिष्ठ पोलीस अधीक्षक : त्याचवेळी दरभंगाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक आकाश कुमार यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले. महिलेला उपचारासाठी डीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी एफएसएल टीमलाही पाचारण करण्यात आले आहे. घटनास्थळाचे छायाचित्रण करण्यात आले आहे. लोकांनी सांगितल्या प्रमाणे या घटनेत सत्यता असल्यास आरोपींवर नक्की कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलीस अधीक्षक आकाश कुमार यांनी दिले.

"सध्या या प्रकरणी दोन एफआयआर करण्यात आले आहेत. एक म्हणजे मुलाची हत्या आणि दुसरी म्हणजे जमावाने महिलेला बेदम मारहाण करणे. कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. या प्रकरणाच्या चौकशीनंतर दोषींवर कारवाई केली जाईल" असे वरिष्ठ पोलीस अधीक्षक, अवसिया कुमार यांनी म्हणटले.

Last Updated : Sep 30, 2022, 11:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details