हैदराबादतेलंगणा पोलिसांनी भाजपचे निलंबित नेते टी राजा सिंह Suspended Telangana BJP MLA Raja Singh यांना पुन्हा अटक केली MLA Raja Singh arrested Again आहे. याआधी राजा सिंह यांच्याविरोधात दाखल असलेल्या जुन्या गुन्ह्यात पोलिसांनी त्यांना हैदराबादमधील आमदार निवासस्थानातून ताब्यात घेतले होते. आज दुपारनंतर, पोलीस राजा सिंह यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांना 41A CrPC अंतर्गत नोटीस दिल्यानंतर ताब्यात BJP MLA Raja Singh arrested again in Hyderabad घेतले. त्याचबरोबर जुन्या प्रकरणात नोटिसा बजावण्यात आल्याचे राजा सिंह यांनी म्हटले आहे.
आमदार राजा सिंह यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यावरून हैदराबादमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. त्यांना पुन्हा अटक करण्याची मागणी करण्यात आली. तणावाच्या पार्श्वभूमीवर आमदार राजा सिंह यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राजा सिंह यांच्या घराकडे जाणाऱ्या मार्गावर पोलिसांनी नाकेबंदी केली आहे.
याआधी 23 ऑगस्ट रोजी राजा सिंह यांच्या विरोधात प्रचंड निदर्शने झाली होती. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. राजा सिंह यांना अटक केल्यानंतर काही तासांत स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. तेथून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. न्यायालयाने राजा सिंग यांच्या वकिलाचा युक्तिवाद मान्य केला होता की, पोलिसांनी त्यांच्या अशिलाला या प्रकरणात अटक करण्यापूर्वी फौजदारी प्रक्रिया संहिता, सीआरपीसीच्या कलम 41 अंतर्गत नोटीस बजावली नव्हती. राजा यांच्या वकिलांनी नंतर पत्रकारांना सांगितले की, पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन केले नाही. ज्या अंतर्गत सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या प्रकरणांमध्ये अटक करण्यापूर्वी नोटीस दिली जावी. त्याच दिवशी, राजा सिंह यांच्या वक्तव्यावरून वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपनेही त्यांना पक्षातून निलंबित केले.