वाराणसी - न्यायालयाच्या आदेशानुसार, वाराणसी येथील ज्ञानवापी कॅम्पसमध्ये 13 मे' कालपासून सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. आजही येथे सर्वेक्षण झाले. हे सर्वेक्षण आजच 14 मे' रोजी पुर्ण होणार होते. ( Gyanvapi Masjid Survey ) मात्र, हे काम पुर्ण झाले नाही अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, उद्याही हे सर्वेक्षण होणार आहे अशीही माहिती त्यांनी दिली आहे. तसेच, आत जी की पहाणी झाली त्यावर बोलण्यास संबंधीत अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे.
शनिवारी, न्यायालयाच्या आदेशानुसार, वाराणसी येथील ज्ञानवापी कॅम्पसमध्ये सर्वेक्षणाची कार्यवाही पूर्ण झाली. या पाहणीवेळी अधिवक्ता आयुक्त अजय मिश्रा, विशाल सिंग आणि सहायक आयुक्त अजय प्रताप उपस्थित होते. वाराणसीचे पोलीस आयुक्त ए. सतीश गणेश यांनी सांगितले की, सर्वेक्षण शांततेत पूर्ण झाले. रविवारी ज्ञानवापी मशिदीच्या वरच्या खोल्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.
शनिवारी झालेल्या सर्वेक्षणादरम्यान वाराणसीचे डीएमही तळघरात उपस्थित होते. सर्वेक्षणादरम्यान आणखी एक तळघर आढळून आले. तळघरातील चार खोल्यांचे सर्वेक्षण शनिवारी पूर्ण झाले. या पथकाने पश्चिमेकडील भिंत आणि नंदीजवळील परिसराचेही सर्वेक्षण केले. तळघरात एक खोली हिंदूंसाठी आणि तीन खोल्या मुस्लिमांसाठी आहेत. दरम्यान, ज्ञानवापी-श्रृंगार गौरी प्रकरणात शनिवारी वकील आयुक्त अजय मिश्रा यांच्यासह वादी-प्रतिवादी पक्षाचे लोक आवारात पोहोचले.
वाराणसीचे जिल्हा दंडाधिकारीकौशल राज शर्मा यांनी सांगितले की, शनिवारी ५० टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सर्वेक्षणात काय झाले, सर्वेक्षण कुठे झाले, हे न्यायालयाच्या आदेशामुळे सांगता येणार नाही. उर्वरित सर्वेक्षण रविवारी पूर्ण होईल. शनिवारच्या कामकाजावर सर्व पक्ष पूर्णत: समाधानी आहेत. व्हिडीओग्राफी करणार्या व्हिडीओग्राफरने सांगितले की, आत अंधार असल्याने काही समस्या येत होत्या, मात्र वाराणसी प्रशासनाने या दिशेने पुढाकार घेतल्याने प्रकाश व्यवस्था करण्यात आली आणि आतील छायाचित्रण पूर्ण करता आले.
या प्रकरणात हिंदू पक्षाच्या वकिलांचे म्हणणे आहे की, अशा अनेक गोष्टी या कारवाईत सापडल्या आहेत, ज्या सांगणे योग्य नाही. या सर्व बाबी पुरावा म्हणून न्यायालयासमोर ठेवल्या जातील. शनिवारी सुमारे ४ तास चाललेल्या या पाहणीत तळघरासह मशिदीच्या बाहेरील भागांचे व्हिडीओग्राफी करण्यात आले. रविवारी सकाळी 8.00 वाजल्यापासून पुन्हा व्हिडीओग्राफी सुरू केली जाईल आणि 12:00 वाजेपर्यंत सुरू राहील. विशेष म्हणजे रविवारी काम पूर्ण न झाल्यास सोमवारीही सर्वेक्षणाचे व्हिडीओग्राफी करण्यात येणार आहे.
या एपिसोडमध्ये फिर्यादी सीता साहू म्हणतात की, आज आम्हाला खूप समाधान मिळाले आहे. प्रशासनाने पूर्ण सहकार्य केले, आम्ही आत गेलो, अगदी तळघरात प्रवेश केला आणि व्हिडिओग्राफीची प्रक्रिया कोणत्याही त्रासाशिवाय पूर्ण झाली. हिंदू बाजूच्या वकिलांचे म्हणणे आहे, की मुस्लिम बाजूने आणि प्रशासनाच्या बाजूने पूर्ण सहकार्य होते.