नवी दिल्ली : आपचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालावल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. त्यामुळे सत्येंद्र जैन यांच्याकडून वैद्यकीय कारणामुळे न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. प्रकृती खाल्यावल्याच्या कारणामुळे न्यायालयाने सत्येंद्र जैन यांना जामीन मंजूर केला आहे. मात्र सत्येंद्र जैन यांनी न्यायालयाच्या परवानगीशिवाय दिल्ली सोडून जाऊ नये, ही अटही न्यायालयाने जामीन देताना ठेवली आहे. त्यामुळे सत्येंद्र जैन यांना न्यायालयाच्या परवानगीशिवाय दिल्ली सोडून जाता येणार नाही.
सत्येंद्र जैन ऑक्सिजनवर : आपचे मंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बाथरुममध्ये पडल्यानंतर त्यांची प्रकृती आणखी खालावली होती. त्यानंतर त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. सत्येंद्र जैन यांना 25 मे रोजी प्रकृती आणखी खालावल्याने दिल्लीतील एलएनजेपी रुग्णालयात हलवण्यात आले होते. दिल्लीतील तिहार कारागृहातील बाथरुममध्ये पडल्याने सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते.
सत्येंद्र जैन मनी लाँड्रींग प्रकरणात अटक :दिल्ली सरकारमधील माजी मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर मनी लाँड्रींगचा आरोप करण्यात आलेला आहे. मनी लाँड्रींग प्रकरणात सत्येंद्र जैन हे गेल्या वर्षभरापासून दिल्लीतील तिहार कारागृहात बंद आहेत. मात्र कारागृहात पडून मार लागल्याने त्यांना चांगलीच दुखापत झाली आहे. त्यामुळे सत्येंद्र जैन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सत्येंद्र जैन यांना 25 मे रोजी ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते.
दिल्ली सोडून जाता येणार नाही :सर्वोच्च न्यायालयाने सत्येंद्र जैन यांना वैद्यकीय कारणामुळे जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांना न्यायालयाच्या परवानगीशिवाय दिल्ली सोडून जाता येणार नसल्याची अट न्यायालयाने ठेवली आहे. त्यासह सत्येंद्र जैन यांना माध्यमांपुढे कोणतेही स्टेटमेंट करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. या दोन अटीवर सत्येंद्र जैन यांना सहा आठवड्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे.
हेही वाचा -
- Shiv Sena Want 22 Lok Sabha Seat : लोकसभेसाठी शिंदे गटाचा प्लान ठरला, 22 जागांवर शिंदे गट लढवणार निवडणूक
- President On Tribal Women : आदिवासी महिला असल्याचा अभिमान आहे - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
- Naxal Girl Passed 12th : जहाल नक्षली ते 12 वी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनी, जाणून घ्या राजुला हिदामीची संघर्षकथा