नवी दिल्ली - कवी डॉ. पी वरवरा राव यांना वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने आज बुधवार (दि. 10 ऑगस्ट) रोजी अंतरिम जामीन मंजूर केला आहे. सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court) वरवरा राव ( Dr. P Varavara Rao ) यांना नियमित जामीन मिळाला आहे. वरवरा राव यांचे वय आणि आजारपण लक्षात घेता त्यांना जामीन मिळाला पाहिजे असे मत न्यायालयाने नोदंवले आहे. भीमा-कोरोगाव हिंसाचार प्रकरणात आरोपी असलेले 82 वर्षीय वरवरा राव यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन वाढवला होता. त्यावर आता सुनावणी होऊन कोर्टाकडून राव यांना जामीन मिळाला आहे.
वरवरा यांनी त्यांना आर्थिक मदत पुरवली - सर्वोच्च न्यायालयाने (2018)च्या भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी कार्यकर्ते आणि कवी डॉ. पी. वरावरा राव यांना वैद्यकीय कारणास्तव नियमित जामीन मंजूर केला आहे. ( Supreme Court of India ) या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज, नागरी हक्कांसाठी काम करणारे गौतम नवलखा, सामाजिक कार्यकर्ते अरुण परेरा, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते व्हर्नोन गोन्सालव्हिस यांनाही अटक करण्यात आली होती. (Bhima Koregaon Case) या सगळ्यांनी मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला, असा त्यांच्यावर आरोप आहे. वरवरा यांनी त्यांना आर्थिक मदत पुरवली, असा त्यांच्यावर आरोप आहे.
कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला - जुलै २०२०मध्ये राव यांची प्रकृती खालावली असून ते मृत्यूशय्येवर आहेत, असे राव यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला सांगितले होते. ८१ वर्षांचे राव यांना उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ( When was Varvara Rao arrested? ) त्यांना कोरोना झाला होता. मात्र, उच्च न्यायालयाने राव यांना जामीन दिला नव्हता. यामुळे राव यांच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.
काय आहे प्रकरण? -31 डिसेंबर 2017 रोजी शनिवारवाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषणानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास करीत असताना या एल्गार परिषदेला माओवादी संघटनांनी पैसा पुरविल्याचे निष्पन्न झाले होते. त्याअनुषंगाने पुणे पोलिसांनी यापूर्वी नक्षलवाद्यांशी संबंधित असलेल्या 5 जणांना अटक केली होती. त्यांच्याकडे केलेल्या तपासात व मिळालेल्या ई-मेलमध्ये राजीव गांधी यांच्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा कट रचला जात असल्याची माहिती मिळाली होती. तसेच बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी या कार्यकर्त्यांचा संबंध असल्याचे निष्पन्न झाल्याने पुणे पोलिसांनी 28 ऑगस्टला कवी वरवरा राव (हैदराबाद), इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकलीचे संपादकीय सल्लागार गौतम नवलाखा (दिल्ली), मानवी हक्क कार्यकर्त्या सुधा भारद्वाज (फरिदाबाद) व व्हर्नोन गोन्साल्विस (मुंबई) अरुण फरेरा (ठाणे) यांना अटक केली होती.
कोण आहेत वरवरा राव - वरवरा राव हे मूळचे तेलंगणातील वारंगलचे असून ते माओवाद्यांचे सहानुभूतीदार, कवी आणि पत्रकार आहेत. ( Who is Varvara Rao? ) मार्क्सवादी समीक्षक म्हणून ओळखले जाणारे कार्यकर्ते आहेत. राव यांनी नवउदारवादी राज्याचा निषेध करणारे अनेक लेख लिहिले आणि सार्वजनिक सभांना संबोधित केले आहे. माओवादी विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी 'विरासम' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्रांतिकारी लेखक संघाच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सामाजिक कार्यकर्ते असण्यासोबतच राव हे एक उत्तम कवी देखील आहेत, त्यांचे 15 काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. 1957 पासून ते कविता लिहित आहेत. ते तेलुगू साहित्यातील उत्कृष्ट समीक्षकांपैकी एक मानले जातात.