महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Super Sheshnag Train : छत्तीसगडमधून नागपुरात सुपर शेषनाग रेल्वेने येणार 16 हजार टन कोळसा, रेल्वेची लांबी 3 किमी

चार मालगाड्या जोडून सुपर शेषनाग ट्रेन बनवण्यात ( length of Super Sheshnag train ) आली. त्याची लांबी 3.2 किलोमीटर ( railway length of super sheshnag ) आहे. ही मालगाडी सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास कोरबा येथून महाराष्ट्रातील नाशिकजवळ कार्यरत असलेल्या सर रतन पॉवर प्लांटसाठी ( coal transport to Sir Ratan power plant ) रवाना करण्यात आली.

चार मालगाड्या जोडून केली सुपर शेषनाग रेल्वे
चार मालगाड्या जोडून केली सुपर शेषनाग रेल्वे

By

Published : May 17, 2022, 5:51 PM IST

कोरबा ( रांची ) - कोळशाच्या टंचाईचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी आहे. कोळशाच्या संकटावरमात करण्यासाठी रेल्वेने एकाच वेळी 16000 टन कोळसा कोरबा येथून नागपूरला पाठवला आहे. त्यासाठी चार मालगाड्या जोडून सुपर शेषनाग ( Super Sheshnag train from korba ) ट्रेन तयार करण्यात आली. यामध्ये 4 इंजिन बसवण्यात आले होते.

रेल्वेचा नवा विक्रम-चार ब्रेक वाहनांसह एकूण 12 क्रू मेंबर्ससह विशेष ट्रेन कोरबा ते नागपूरला पाठविण्यात येत आहे. मालगाड्यांच्या चार रेकमध्ये एकूण 232 वॅगन पाठवण्यात आल्या ( 232 wagons in special train ) आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोळसा एकाच वेळी पाठवून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने नवा विक्रम ( South East Central Railway record ) केला आहे.

छत्तीसगडमधून नागपुरात रेल्वेने येणार 16 हजार टन कोळसा

सुपर शेषनाग ट्रेनची लांबी 3 किलोमीटरहून अधिक - चार मालगाड्या जोडून सुपर शेषनाग ट्रेन बनवण्यात ( length of Super Sheshnag train ) आली. त्याची लांबी 3.2 किलोमीटर ( railway length of super sheshnag ) आहे. ही मालगाडी सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास कोरबा येथून महाराष्ट्रातील नाशिकजवळ कार्यरत असलेल्या सर रतन पॉवर प्लांटसाठी ( coal transport to Sir Ratan power plant ) रवाना करण्यात आली. यामध्ये 16 हजार टन कोळसा एकाच वेळी पाठवण्यात आला आहे. हा नवा विक्रम आहे.

याआधीही धावली शेषनाग ट्रेन- याआधीही शेषनाग ट्रेन धावली आहे. गेल्या वर्षी दोन वेळा दोन मालगाड्या जोडून शेषनाग ट्रेन चालवण्यात आली होती. पण कोरबा येथून चार मालगाड्या जोडून सुपर शेषनाग रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

छत्तीसगड एक्स्प्रेसला उशीर - शेषनागच्या लांबीमुळे सिंगल ट्रॅकवरून गाड्या जाण्यात अडचण येत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे छत्तीसगड एक्स्प्रेस काही काळ आऊटरमध्ये थांबवण्यात आली होती.

प्रवाशांना त्रास - छत्तीसगड एक्स्प्रेस बिलासपूरला अर्धा तास उशिरा पोहोचली. त्यामुळे प्रवाशांनीही गोंधळ घातला. मात्र, रेल्वेच्या म्हणण्यानुसार फारशी अडचण आली नाही. सुपर शेषनागने यशस्वीपणे मार्ग मोकळा केला. रेल्वेने 450 किलोमीटरहून अधिक लांब अंतर कापले आहे.

पावसाळ्यापूर्वी कोळसा पोहोचविण्यास प्राधान्य - एप्रिल महिन्यात रेल्वेने एक परिपत्रकही जारी केले होते. पावसाळ्यापूर्वी वीज क्षेत्राला पुरेशा प्रमाणात कोळसा पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे रेल्वेने म्हटले होते. कोळसा साठवणीला रेल्वेने प्राधान्य दिले आहे. कोळसा पोहोचवितानाही प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा-Power crisis in India : अमित शाह यांनी निवासस्थानी घेतली बैठक; वीजसंकटाबाबत मंत्र्यांबरोबर चर्चा

हेही वाचा-डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलीला गमवावा लागला हाताचा तळवा; 20 वर्षानंतर 16 लाखांची भरपाई देण्याचे तेलंगाणा ग्राहक आयोगाचे आदेश

हेही वाचा-Chethana Raj dies during surgery : धक्कादायक! लठ्ठपणावर शस्त्रक्रिया केल्यानंतर कन्नड अभिनेत्रीचा रुग्णालयात मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details