उदयपुर :जिल्ह्यात मंगळवारी एका पित्याने आपल्या तीन मुलांसह आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस ठाण्याने घटनास्थळ गाठून चारही मृतदेह आपल्या ताब्यात घेत घटनेचा तपास केला. दरम्यान, हे मृतदेह तपासणीसाठी पाठवले. या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने पित्याने आपल्या तिन्ही मुलांसह आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
सध्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही : एसपी विकास शर्मा यांनी सांगितले की, ही घटना उदयपूरच्या कोटरा पोलीस स्टेशनच्या मामेर भागातील नाकारा गावातील आहे. येथे एका पित्याने स्वतःच्या तीन मुलांसह आत्महत्या केली. सध्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही. एसपी शर्मा म्हणाले की, प्रकरण समोर आल्यानंतर सर्व अधिकारी या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मृताच्या पत्नीचे ४ वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर संपूर्ण कुटुंब नैराश्यातून जात असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले. त्यानंतर ही घटना घडली.