मुंबई : इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात शुक्रवारी वाढ होत राहिली. बीएसई सेन्सेक्स सुरुवातीच्या व्यापारात 644 अंकांवर चढला. जागतिक बाजारात सुरु असलेल्या तेजीचा परिणाम सेन्सेक्सवर दिसून येत आहे. त्यामुळे शेअर बाजारात सकाळच्या सत्राची सुरुवात मजबूत अशी झाली ( Share Market Update ) आहे.
बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स सुरुवातीच्या व्यवहारात 644.15 अंकांच्या उसळीसह 52,909.87 वर व्यवहार करत होता. NSE निफ्टी देखील 192.6 अंकांनी वाढून 15,749.25 वर पोहोचला. सेन्सेक्स पॅकमधून, इंडसइंड बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, अल्ट्राटेक सिमेंट, डॉ रेड्डीज, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक प्रमुख वधारले. दुसरीकडे, टेक महिंद्रा, एशियन पेंट्स आणि मारुती सुझुकी इंडिया पिछाडीवर होते.