नवी दिल्ली :मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरची (Twitter) मालकी घेतल्यानंतर एलॉन मस्कने (Elon Musk) मोठे निर्णय घेत अनेक उच्च अधिकाऱ्यांना हटवले आहे. यात CEO पराग अग्रवाल यांचा ही समावेश आहे. त्यामुळे पराग अग्रवाल यांच्यानंतर ट्विटरचे नवे सीईओ कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच ट्विटर CEO ची जागा भारतीय वंशाची व्यक्ती घेणार असल्याचे संकेत मिळत आहे. श्रीराम कृष्णन् (Sriram Krishnan) हे ट्विटरच्या CEO पदाची जबाबदारी संभाळणार आहे. कृष्णन हे 16Z चे जनरल पार्टनर आहेत.
श्रीराम कृष्णन् हे चेन्नई येथे लहानाचे मोठे झाले. साधारण कुटुंबात जन्मलेल्या श्रीराम यांचे वडील एका विमा कंपनीत काम करत होते तर आई गृहिणी होती. 2005 मध्ये, ते सिएटल, यूएसए येथे गेले आणि मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी सुरू केली. त्यावेळी श्रीराम कृष्णन 20 वर्षांचे होते. या ठिकाणी त्यांनी विंडोज अझूरशी संबंधित अनेक प्रकल्पांत काम केले. प्रोग्रॅमिंग विंडोज अझूर या पुस्तकाचे ते लेखक आहेत. दरम्यान, श्रीराम यांची पत्नी आरतीसोबतची भेटही खूप रंजक आहे. 2002 मध्ये याहू मेसेंजरवर दोघांची भेट झाली होती. तेव्हापासून हे दोघे एकत्र आहेत. श्रीरामने पत्नी आरती राममूर्तीसोबत एक पॉडकास्ट/यूट्यूब चॅनलही होस्ट केले आहे
ट्विटरमध्ये नवीन CEO म्हणून श्रीराम कृष्णन् यांचे नाव चर्चेत आहे. याला कारण देखील तसं आहे, मस्कने ट्विटरमध्ये अनेक बदल करत उच्च अधिकाऱ्यांना हटवले आहे. त्यानुसार ECO पदासाठी श्रीराम कृष्णन् यांना त्यांच्या पूर्वीच्या अनुभवामुळे प्राधान्य दिले जाऊ शकते. कृष्णन हे तंत्रज्ञ आणि अभियंता आहेत. ते नुकत्याच सुरू होणाऱ्या स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करतात. आतापर्यंत त्यांनी 23 गुंतवणूक केल्या आहेत. नुकतेच 4 ऑक्टोबर 2022 रोजी Lasso Labs मध्ये त्यानी गुंतवणूक केली. Lasso Labs ने 4.2 दशलक्ष डॉलर निधी उभारला आहे. याआधी कृष्णन यांनी ट्विटर, मेटा आणि मायक्रोसॉफ्ट येथे उत्पादन आणि इंजिनीरिंग टीम लीड केल्या आहे. यासह ते Bitsky, Hoppin’ आणि Polyworks च्या बोर्डावर देखील आहे