हैदराबाद - यंदाच्या वर्षाला निरोप देताना राष्ट्रीय स्तरावर घडलेल्या राजकीय घडामोडींचा लेखाजोखा 'ईटीव्ही भारत'या रिपोर्टमधून वाचकांसमोर आणत आहे. मार्च महिन्यापासून कोरोनाने धुमाकूळ घातल्यानंतरही देशातील सर्व क्षेत्रात मोठ्या घडामोडी झाल्या. याच्या केंद्र स्थानी केंद्र सरकारने घेतलेले निर्णय, आयोध्येतील राम मंदिर, अनेक क्षेत्रांत खासगीकरणाला मोदी सरकारने दिलेली परवानगी, हे विषय महत्वाचे ठरले. तसेच न्यायालयाची भूमिका, राज्यपालांचे निर्णय आणि गाजलेले निर्णय यांचा आढावा या रिपोर्टमधून घेणार आहोत.
अलविदा 2020 : वर्षभरातील राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा
यंदाच्या वर्षाला निरोप देताना राष्ट्रीय स्तरावर घडलेल्या राजकीय घडामोडींचा लेखाजोखा 'ईटीव्ही भारत'या रिपोर्टमधून वाचकांसमोर आणत आहे. मार्च महिन्यापासून कोरोनाने धुमाकूळ घातल्यानंतरही देशातील सर्व क्षेत्रात मोठ्या घडामोडी झाल्या. याच्या केंद्र स्थानी केंद्र सरकारने घेतलेले निर्णय, आयोध्येतील राम मंदिर, अनेक क्षेत्रांत खासगीकरणाला मोदी सरकारने दिलेली परवानगी, हे विषय महत्वाचे ठरले.
अलविदा 2020 : वर्षभरातील राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा
२०२० मधील महत्त्वाच्या घडामोडी
- सर्वोच्च न्यायालयाने बहुमत सिद्ध करण्याचा निर्णय दिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथ यांनी २० मार्चला राजीनामा दिला. यानंतर विधानसभेत बहुमत चाचणी घेण्यात आली.
- 15जानेवारी - १९८४ साली झालेल्या शिख दंग्यांप्रकरणी एसआटीच्या १८६ प्रकरणातील शिफारसी केंद्र सरकारने स्वीकारल्या.
- 22 जानेवारी - भारत आणि ब्राझील दरम्यान सहकार्य, परस्पर संबंध, भौगोलिक संशोधन, ऑईल अॅन्ड नॅचरल गॅस यांसंदर्भात मोठा करार झाला
- 27 जानेवारी - भारत सरकारने एअर इंडिया कंपनीतील १०० टक्के समभाग विकण्याचा निर्णय जाहीर केला.
- 27 जानेवारी - सीएए कायद्याविरोधात ठराव पारित करणारे पश्चिम बंगाल देशातील तिसरे राज्य झाले.
- अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा 'नमस्ते ट्रम्प' हा भारत दौरा
- 23 मार्चला शिवराजसिंह चौहान यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
- 17 सप्टेंबरला शिरोमणी अकाली दलाचे खासदार आणि खाद्य मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी कृषी विधेयकाविरोधात आजाव उठवत संसदेत राजीनामा दिला.
- 18 जून - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ४१ कोळसा खाणींच्या खासगीकरणाला परवानगी दिली.
- 29 जुलै - केंद्र सरकारने ५९ चायनीज अॅपवर भारतात बंदी घातली. यामध्ये टीकटॉक, वी चाट, पब-जी सारख्या खेळांचा समावेश होता.
- 18 जून - भारताची नॉन परमनंट मेंबर म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत निवड(२ वर्षांसाठी)
- 17 सप्टेंबर - कृषी विधेयकाला मंजूरी ; विधेयकाचे कायद्यात रुपांतरण