महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Special Session Of Parliament : मोदी सरकारनं बोलावलं संसदेचं विशेष अधिवेशन, 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान होणार पाच बैठका - Narendra Modi

Special Session Of Parliament : मोदी सरकारनं आज अचानक संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा केली. हे अधिवेशन 18 ते 22 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. यादरम्यान पाच बैठका होणार आहेत. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी 'X' या सोशल मीडिया साइटवर ही माहिती दिली. (Special Session Of Parliament)

Special Session Of Parliament
Special Session Of Parliament

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 31, 2023, 4:54 PM IST

नवी दिल्लीSpecial Session Of Parliament : मोदी सरकारनं संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची माहिती दिलीय. हे अधिवेशन 18 ते 22 सप्टेंबरपर्यंत दरम्यान होणार आहे. यामध्ये पाच बैठका होणार आहेत. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी ही माहिती दिली. संसदीय कामकाज मंत्री जोशी यांनी 'X' या सोशल मीडिया साइटवरील आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'संसदेचं विशेष अधिवेशन 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान बोलावण्यात आलं आहे.' (Parliamentary Affairs Minister Prahlad Joshi)

विशेष अधिवेशनात पाच बैठका :संसदेच्या या विशेष अधिवेशनाच्या अजेंड्याबाबत अधिकृतपणे काहीही माहिती देण्यात आलेली नाही. तथापि, 9, 10 सप्टेंबर रोजी दिल्लीत G-20 शिखर होणार आहे. त्यानंतर काही दिवसांनी संसदेचं अधिवेशन सत्र होणार आहे. संसदेच्या या विशेष अधिवेशनात पाच बैठका होणार असल्याचं जोशी यांनी त्यांच्या 'एक्स' या सोशल मिडिया हँडलवर म्हटलं आहे. (Parliament session)

अधिवेशनात विरोधकांकडून चर्चेची अपेक्षा :संसदेच्या या विशेष अधिवेशनात विरोधकांकडून चर्चेची अपेक्षा आहे. याआधी मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यावेळी सत्ताधारी तसंच विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली होती. त्यानंतर विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर बहिष्कार टाकत सभागृह सोडलं होतं. (MP Rahul Gandhi)

राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल : काँग्रेसचे खासदार राहुल गांधींना त्यांचं सदस्यत्व बहाल केल्यानंतर पावसाळी अधिवेशनात त्यांनी भाग घेतला होता. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात मणिपूर हिंसाचारावर केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. तसंच, अविश्वास ठरावावरील चर्चेच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं. (Rahul Gandhi attack on Modi)

ABOUT THE AUTHOR

...view details