वाराणसी ( लखनौ )- धर्म आणि अध्यात्माव्यतिरिक्त वाराणसी शहर हे सांस्कृतिक परंपरा आणि विविध भाषांसाठीदेखील ओळखले जाते. वाराणशीमध्ये भोजपुरीशिवाय इतरही अनेक भाषा बोलणारे लोक आहेत. हे लोक देशाच्या विविध भागांतून येतात. पण, वाराणशीतील गंगेच्या घाटावर काही लोक पोट भरण्यासाठी सांकेतिक शब्द ( Special code language in UP ) वापरतात. या भाषेला डिकोड करणे प्रत्येकाला शक्य नसते. फक्त येथील नाविक ही सांकेतिक भाषा डीकोड करू शकतात.
वाराणशीच्या घाटांवर बोलली जाणारी अशी कोणती सांकेतिक भाषा आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण गंगा घाटावर उपस्थित नाविक ( sailors on the Ganga Ghat ) आपल्या ग्राहकांना बोटीपर्यंत नेण्यासाठी खास प्रकारचे ( code language in Ganga Ghats ) भाडे कोड वापरतात. आज आम्ही तुम्हाला वाराणशीतील या सांकेतिक शब्दांबद्दल सांगणार आहोत. सकाळचे सुमारे दहा वाजले होते. या कडक उन्हात आम्ही वाराणसीच्या दशाश्वमेध घाटावरही पोहोचलो. हा घाट बनारसचा मुख्य घाट मानला जातो. पर्यटक या घाटावर आवर्जून जातात. पण घाटाच्या पायर्या उतरून खाली आल्यानंतर मोठ्या छत्रीखाली रंगीबेरंगी कपडे घातलेले काही लोक हजर होते. या लोकांचे आम्ही निरीक्षण करण्यास सुरुवात केली.
सांकेतिक शब्दांचे गूढ - घाटावर बसलेले सर्व लोक नाविक समाजाचे होते. हे लोक कडक उन्हात स्वत:चे आणि आपल्या कुटुंबियांचे पोट भरण्यासाठी ग्राहक शोधत होते. ग्राहकांना शोधण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी होती. प्रत्येकाला ग्राहक मिळावेत म्हणून नाविकांनी खूप पूर्वी सांकेतिक शब्द ( कोड सिस्टम ) तयार केले आहेत. वाराणशीच्या या घाटावर या कोड पद्धतीच्या आधारे ग्राहकांना त्यांच्या बोटीवर नेण्याचे काम नाविकांच्यावतीने केले जाते. नाविकांचे सांकेतिक शब्द हे फक्त नाविकांनाच समजू शकतात.
असे ग्राहक मिळवितात- बनारसच्या गंगेच्या घाटावर गेल्या अनेक पिढ्यांपासून बोटीचे मालक असलेले संजय म्हणाले की, आम्ही अनेक पिढ्यांपासून असेच ग्राहक तयार करण्याचे काम करतो. प्रत्येक घाटावर शेकडो नाविक असतात. त्यामुळे जास्त गर्दी आणि अनावश्यक तणाव टाळण्यासाठी हा कोड वर्ड बनविला होता. संजय पुढे म्हणाले की, ही आमची परस्पर समजूत आहे. यासाठी कपड्यांचा रंग, त्याची शरीरयष्टी, त्याची चालण्याची शैली, त्याच्या हातातील कोणतीही वस्तू, खांदे आणि लटकलेल्या पिशव्या किंवा त्याचा लूक यानुसार आम्ही कोडवर्ड तयार करतो. गर्दीत एखाद्या व्यक्तीला पाहून तळातील नाविकांनी पहिला शब्द उच्चारला तरी तो पर्यटक त्याचा ग्राहक बनतो.