महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Sonia Gandhi leaves ED office : २ तासांची चौकशी.. सोनिया गांधी ईडी कार्यालयातून बाहेर.. आजची चौकशी संपली - सोनिया गांधी ईडी चौकशी

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची आज ईडी चौकशी करण्यात ( Sonia Gandhi ED Enquiry ) आली. २ तासांच्या चौकशीनंतर त्या आता ईडी कार्यालयातून बाहेर पडल्या ( Sonia Gandhi leaves ED office ) आहेत. नॅशनल हेरॉल्ड मनी लॉन्डरिंग प्रकरणात ( National Herald money laundering case ) ही चौकशी झाली.

Sonia Gandhi
सोनिया गांधी

By

Published : Jul 21, 2022, 3:17 PM IST

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ( National Herald money laundering case ) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची दोन तास चौकशी ( Sonia Gandhi ED Enquiry ) करून जबाब नोंदवले. कोविडमधून बरे होत असल्याने त्यांच्या विनंतीवरून आज दिवसभराची चौकशी संपविण्यात आल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी ( Sonia Gandhi leaves ED office ) सांगितले.

१२.३० वाजता चौकशी झाली सुरु :गांधी, 75, मध्य दिल्लीतील ए पी जे अब्दुल कलाम रोडच्या बाजूला असलेल्या विद्युत लेन येथे असलेल्या ईडी मुख्यालयात दुपारनंतर थोड्या वेळाने त्यांच्या झेड + श्रेणीच्या सीआरपीएफ सुरक्षा कवचात पोहोचल्या. समन्सची पडताळणी आणि हजेरी पत्रकावर स्वाक्षरी अशा काही औपचारिकता पूर्ण केल्यानंतर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास चौकशी सुरू झाली, असे सूत्रांनी सांगितले.

वैद्यकीय कारणामुळे जाण्याची परवानगी :वैद्यकीय कारणास्तव त्यांच्या विनंतीवरून त्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे सूत्रांनी सांगितले. नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राची मालकी असलेल्या काँग्रेस प्रमोट केलेल्या यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडमधील कथित आर्थिक अनियमिततेशी संबंधित ही चौकशी आहे.

संसदेत गदारोळ :काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना आज ईडीसमोर हजर राहावे लागणार आहे. नॅशनल हेराल्ड संबंधी मनी लाँड्रिंग प्रकरणी त्यांची चौकशी होणार आहे. मात्र, त्यांच्या चौकशी आधीच देशात काँग्रेस पक्षाकडून ईडी ( Uproar in Parliament over Sonia Gandhi ED inquiry ) आणि केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली जात आहे. या विरोधाची ठिणगी संसदेतही पडली आहे. राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांमध्ये घोषणाबाजी झाल्याने तेथील कामकाज तहकूब ( Lok Sabha adjourned ) करण्यात आले आहे. लोकसभेत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी विरोधकांवर चांगलेच संतापले. कायद्यापुढे सर्वे सारखे आहेत की नाही? काँग्रेस अध्यक्ष काय सुपर ह्यूमन आहेत का? काँग्रेस स्वत: ला कायद्याच्या वरती समजते काय? असा संतप्त सवाल करत जोशी यांनी विरोधकांना धारेवर धरले.

हेही वाचा :Sonia Gandhi ED inquiry : सोनिया गांधींच्या ईडी चौकशीवरून संसदेत गदारोळ, कायद्यापुढे सर्व सारखे आहेत की नाही? केंद्रीय मंत्र्याचा सवाल

ABOUT THE AUTHOR

...view details