महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

वायू प्रदुषणाचा धोका; काही दिवस सोनिया, राहुल गांधींचा मुक्काम गोव्यात

शुक्रवारी सायंकाळी त्या डाबोलिम आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्या. यानंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी दक्षिण गोव्यात स्थित असलेल्या एका रिसॉर्टसाठी रवाना झाले.

sonia gandhi, rahul gandhi
सोनिया गांधी, राहुल गांधी

By

Published : Nov 20, 2020, 8:10 PM IST

नवी दिल्ली -नवी दिल्ली येथील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्ष सोनिया गांधी शुक्रवारी संध्याकाळी गोव्यात पोहोचल्या आहे. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र आणि काँग्रेस नेते राहुल गांधीदेखील आहेत. वाढते प्रदूषण आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी त्यांनी दिल्लीहून बाहेर जाण्याचा सल्ला दिला होता.

याबाबत दिल्लीतील 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी माहिती देताना.

शुक्रवारी सायंकाळी त्या डाबोलिम आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्या. यानंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी दक्षिण गोव्यात स्थित असलेल्या एका रिसॉर्टसाठी रवाना झाले. ते काही दिवस येथे थांबणार आहेत. दरम्यान, आधी हे म्हटले जात होते, की त्या शिमल्याला जाणार आहेत. मात्र, तेथील तापमान खूप थंड आहे. यानंतर त्यांनी गोव्याला जाण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा -देशाचे विभाजन करण्यासाठी 'लव्ह जिहाद' हा भाजपानिर्मित शब्द

सोनिया गांधी मेडिकेशनवर -

सोनिया गांधी यांना दोन ऑगस्टला दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. यानंतर त्या मेडिकेशनवर आहेत. त्यांच्या छातीतील संसर्गाने डॉक्टर चिंतीत आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील प्रदूषण पाहता डॉक्टरांनी त्यांना हवाबदल करण्याचा सल्ला दिला होता.

दरम्यान, दिल्लीत शुक्रवारी सकाळी 10 वाजता एअर क्वालिटी इंडेक्स गंभीर स्वरुपाचा म्हणजे 305 इतका होता.

ABOUT THE AUTHOR

...view details