महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Sonia Gandhi In Loaksabha : सोशल मीडियामुळे लोकशाही 'हॅक' होण्याचा धोका - सोनिया गांधी - Misuse of social media

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session of Parliament) काँग्रेसने सोशल मीडियाच्या वाढत्या गैरवापरावर चिंता व्यक्त केली. सोशल मीडियामुळे लोकशाही 'हॅक' होण्याचा धोका (Social media threatens to hack democracy) असल्याचे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सोनिया गांधी (MP Soniya Gandhi) यांनी लोकसभेत सांगितले.

By

Published : Mar 16, 2022, 5:16 PM IST

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Congress President Sonia Gandhi) यांनी बुधवारी लोकसभेत आपल्या भाषणातून भारतातील निवडणुकीच्या राजकारणातील सोशल मीडियाचा प्रभाव संपविण्याचे आवाहन सरकारला केले. लोकसभेत शून्य तासात त्या बोलत होत्या. गांधींनी अल जझीरा आणि द रिपोर्टर्स कलेक्टिव्हमध्ये मधे प्रकाशित झालेल्या एका अहवालाचा संदर्भ दिला ज्यात म्हणले आहे की, फेसबुकने भाजपला इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत निवडणूक जाहिरातींसाठी कमी पैशात ऑफर दिली होती.

सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना टार्गेट करण्यासाठी फेसबुक आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा कसा दुरुपयोग केला जातो यावर त्या बोलल्या. सोशल मीडिया कंपन्यांवर काही राजकीय पक्षांची बाजू घेत असताना इतरांशी भेदभाव केल्याचा आरोपही त्यांनी केला. "जागतिक सोशल मीडिया कंपन्या सर्व पक्षांना समान क्षेत्र प्रदान करत नाहीत हे वारंवार निदर्शनास आले आहे. "सत्ताधारी प्रस्थापितांच्या संगनमताने ज्या निंदनीय रीतीने सामाजिक सलोखा बिघडवत आहे ते आपल्या लोकशाहीसाठी धोकादायक आहे. सोशल मीडिया चुकीची आणि प्रॉक्सी जाहिरात कंपन्यांच्या माध्यमातून तरुणांना तसेच समाजाला सारखे द्वेषाने भरवले जात आहे. फेसबुकला याची जाणीव होती. ते आणि त्यातून फायदा करुन घेत आहेत असेही त्यांनी सांगितले.

"जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या निवडणुकीत फेसबुक आणि इतर सोशल मीडिया दिग्गजांचा हा पद्धतशीर प्रभाव आणि हस्तक्षेप थांबवावा, अशी विनंती त्यांनी सरकारला केली," " कोणाचीही पर्वा न करता आपण लोकशाही आणि सामाजिक सौहार्दाचे रक्षण करणे आवश्यक आहे," असेही त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details