महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Snake Killed And Burnt : 'साप चावला असता तर जबाबदार कोण?' म्हणत सापाला मारून टाकले!, व्हिडिओ व्हायरल - सापाला जाळून मारले

उत्तर प्रदेशच्या बदायूं जिल्ह्यात एका सापाला जाळून मारल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

Snake Killed And Burnt
Snake Killed And Burnt

By

Published : Jun 10, 2023, 7:09 PM IST

पहा व्हायरल व्हिडिओ

बदायूं (उत्तर प्रदेश) :उत्तर प्रदेशच्याबदायूंजिल्ह्यात उंदीर आणि कुत्र्यांनंतर आता साप मारणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनविभागाचे वनरक्षक कृष्णकुमार यादव यांच्या तक्रारीनंतर वनसंरक्षण कायद्यान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वन विभागाने दखल घेतली : घडले असे की, जिल्ह्यातल्या बिसौली कोतवाली भागात एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये काही तरुणांनी सापाला पकडून जाळले आणि याची कबुली व्हिडिओमध्ये दिली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली. वनरक्षक कृष्ण कुमार यांनी बिसौली कोतवाली येथे तक्रार दिली आणि आरोपी जोएब विरुद्ध एफआयआर नोंदवला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत जळालेला साप घटनास्थळावरून हटवला होता.

आरोपींनी व्हिडिओत दिली साप मारल्याची कबुली :बिसौली शहरातील ईदगाह रोडवर एक लाकडी स्टॉल आहे. या स्टॉलमधून एक साप बाहेर आला. यानंतर त्याची हत्या करून त्याला जाळण्यात आले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर प्राणीप्रेमी विभोर शर्मा यांनी वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर वन कर्मचारी कृष्ण कुमार यादव घटनास्थळी पोहोचले. मात्र त्यांना तेथे सापाला मारून जाळल्याचा कोणताही पुरावा आढळून आला नाही. पण, व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आरोपीने आपणच सापाला मारून जाळल्याची कबुली दिली होती.

'..म्हणून सापाला मारले' :त्यानंतर वनविभागाच्या पथकाने आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. पथकाने आरोपीला विचारपूस केली असता साप चावला असता तर जबाबदार कोण असे त्याने म्हटले. तो म्हणाला की यामुळे मी सापाला मारले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम 9 आणि 51 अन्वये गुन्हा दाखल केला आला. ही बाब परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. ईटीव्ही भारत मात्र या व्हायरल व्हिडिओची पुष्टी करत नाही.

हेही वाचा :

  1. Snake In Mid Day Meal : बिहारमध्ये मिड-डे मीलमध्ये आढळला साप! 100 हून अधिक मुलांची तब्बेत बिघडली
  2. Snake In ATM : धक्कादायक! ATM मधून नोटांऐवजी निघू लागली चक्क सापांची पिल्ले!
  3. Python Rescued Video : 14 फूट लांब, 74 किलो वजन; 'या' विशालकाय अजगराची वनविभागाने केली सुटका

ABOUT THE AUTHOR

...view details