महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दहशतवाद्यांशी संबंध असलेले जम्मू आणि काश्मीरचे सहा सरकारी कर्मचारी बडतर्फ - जाफर हुस्सेन बट्ट

दहशतवाद्यांशी संबंध ठेवल्यामुळे जम्मू काश्मीरच्या सहा कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली आहे. नोकरीमधून हकालपट्टी झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये अब्दुल हमीद वाणी, जाफर हुस्सेन बट्ट, मोहम्मद रफी बट्ट, लिकायत अली काकरू, तारीक महमुद कोहल आणि शौकत अहमद खान यांचा समावेश आहे.

जम्मू काश्मीर
जम्मू काश्मीर

By

Published : Sep 22, 2021, 5:29 PM IST

श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर)- दहशतवाद्यांशी संबंध असलेल्या जम्मू आणि काश्मीरच्या सहा सरकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. या सरकारी कर्मचाऱ्यांबाबत केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरने समिती नेमली होती. या समितीच्या शिफारशीवरून कारवाई करण्यात आल्याचे सूत्राने सांगितले आहे.

नोकरीमधून हकालपट्टी झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये अब्दुल हमीद वाणी, जाफर हुस्सेन बट्ट, मोहम्मद रफी बट्ट, लिकायत अली काकरू, तारीक महमुद कोहल आणि शौकत अहमद खान यांचा समावेश आहे.

हेही वाचा-खासदार असुद्दीन ओवैसी यांच्या दिल्लीमधील निवासस्थानी तोडफोड; 5 जण ताब्यात

हे आहेत बडतर्फ झालेले सरकारी कर्मचारी-

  1. अब्दुल हमीद वाणी हा अनंतनाग जिल्ह्यामधील बिजबेहरामधील रहिवाशी आहे. तो शिक्षक म्हणून कार्यरत होता. सुत्राच्या माहितीनुसार वाणी हा शिक्षक होण्यापूर्वी अल्लाह टायगर या दहशतवादी संघटनेचा जिल्हा कमांडर म्हणून कार्यरत होता. त्याने निवड प्रक्रिया टाळून नोकरी मिळविली होती. दहशतवादी बुरहान वाणीच्या एन्काउन्टनंतर झालेल्या कार्यक्रमात 2016 मधील कार्यक्रमात अब्दुल हमीद वाणी याने भाषण केले होते.
  2. जाफर हुस्सेन बट हा किश्तवारमधील रहिवासी आहे. तो जम्मू आणि काश्मीरमध्ये पोलीस म्हणून कार्यरत होता. त्याला राष्ट्रीय गुप्तचर संस्था आणि पोलिसांनी 2019 मध्ये अटक केली आहे.
  3. मोहम्मद रफी बट्ट हा किश्तवारमधील रहिवाशी आहे. तो रस्ते आणि बांधकाम विभागात ज्यूनिअर असिस्टंट कार्यरत होता. हिज्बुल मुजाहिदीन यांना लॉजिस्टिक मदत केल्याचा बट्ट याच्यावर आरोप आहे.
  4. लिकायत अली काकरू हा बारामुल्ला जिल्ह्यात 1983 पासून शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याने स्थानिक दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिल्याचे 2001 मध्ये उघडकीस आले आहे.
  5. तारीक महमुद कोहल हा पुंछमधीर रहिवाशी आहे. तो वनविभागात रेंज अधिकारी म्हणून कार्यरत होता. तस्करी, बेकायदेशीर शस्त्रांची वाहतूक, स्फोटके आणि पाकिस्तानमधून बनावट भारतीय चलन आणल्याचा कोहल याच्यावर आरोप आहे.
  6. शौकत अहमाद खान बा बडगाम जिल्ह्यातील रहिवाशी आहे. तो जम्मू आणि काश्मीर पोलीसमध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर शस्त्र लुटीचे आरोप आहेत.

हेही वाचा-मोदी सरकारचा मोठा निर्णय; सेतू सुविधा केंद्रांमध्ये रेशनकार्डाशी संबंधित सेवा मिळणार!

ABOUT THE AUTHOR

...view details