यंदा 13 फेब्रुवारी 2023 सोमवार रोजी श्री संत गजानन महाराजांचा 145 वा प्रकटदिन महाराष्ट्रासह अख्ख्या देशभरात साजरा केल्या जाणार आहे. गेले दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अगदी कमी भाविकांच्या उपस्थितीत प्रगट दिनाचा सोहळा पार पडला. मात्र यंदा श्री संत गजानन महाराजांचा 145 वा प्रकटदिन आहे आणि त्यातच सगळीकडे निर्बंधमुक्त वातावरण असल्याने, यावर्षी शेगांव येथे देखील भाविकांची तुफान गर्दी दिसुन येणार आहे.
गजानन महाराज लोकांच्या दृष्टीस : माघ वद्य सप्तमी म्हणजे २३ फेब्रुवारी १८७८ रोजी बुलडाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण होते, अशी दंतकथा आहे. बिरुदुराजू रामराजू नावाच्या एका लेखकाने 'आंध्रा योगुलु' नावाच्या पुस्तकात गजानन महाराज तेलंगी ब्राह्मण असल्याचे लिहिले आहे. 'गण गण गणात बोते'चा गजर, अभिषेक, पालखी, पारायण अशा धार्मिक वातावरणात श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात येतो. यंदा 13 फेब्रुवारी 2023 सोमवार रोजी श्री संत गजानन महाराजांचा 145 वा प्रकटदिन महाराष्ट्रासह अख्ख्या देशभरात प्रचंड उत्साहात साजरा केल्या जाणार आहे.
भाकरीचा प्रसाद :लोकमान्य टिळक यांनी गजानन महाराजांची भेट घेतली होती. अकोल्यात शिवजयंतीनिमित्त झालेल्या एका सभेला, टिळकांबरोबर गजानन महाराजही व्यासपीठावर बसले होते. लोकमान्य टिळकांना कैद झाली, त्यावेळी महाराजांनी त्यांच्याकरिता भाकरीचा प्रसाद पाठविला आणि भविष्य वर्तवले की, टिळकांना शिक्षा अटळ आहे. महाराजांच्या भविष्यवाणीनुसार, ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी 'गीतारहस्य' ही भगवदगीतेवर टीका लिहिली.