नवी दिल्ली : Shraddha Murder Case: दिल्लीत प्रेयसी श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करणाऱ्या आफताब अमीन पूनावालाबाबत धक्कादायक खुलासे होत आहेत. अटक करण्यात आलेल्या आफताबची पोलीस चौकशी करत आहेत. तो जबाब बदलण्याचाही वारंवार प्रयत्न करत आहेत. ताज्या माहितीनुसार, पोलिसांना अद्याप श्रद्धाचे शीर सापडलेले head not yet found नाही. त्याचा शोध सुरूच आहे. पोलीस आफताबला घेऊन मेहरौलीच्या जंगलात जात असून, त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. police engaged in search of Aftab
प्रेयसी श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करण्यात आले. आफताबने पोलिसांना सांगितले की, लिव्ह-इनमध्ये राहणारी त्याची गर्लफ्रेंड श्रद्धा हिची हत्या केल्यानंतर त्याने तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. रक्त स्वच्छ करण्यासाठी गुगलची मदत घेतली. तसेच गुगलवर जाणून घ्यायचे होते की, मानवी शरीराची आतून रचना काय आहे. आफताब अजून धक्कादायक खुलासे करणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वेगवेगळ्या टीम तयार करून पोलिसांना दिल्लीच्या मेहरौली भागात पाठवले जात आहे, कारण आफताबच्या म्हणण्यानुसार, त्याने श्रद्धाच्या शरीराचे 35 तुकडे केले, परंतु काही तुकडे अद्याप मिळालेले नाहीत. आतापर्यंतच्या तपासात असेही समोर आले आहे की, आरोपीने झोमॅटोकडून अन्न मागवले होते आणि मृतदेह बाहेरून दुर्गंधी येऊ नये म्हणून अगरबत्तीचा सेट ठेवत असे. खून केल्यानंतर आरोपी रात्री 12 ते 1 च्या दरम्यान त्याच्या खोलीतून एक तुकडा मेहरौलीच्या जंगलात नेत असे आणि तेथे फेकून देत असे. एवढेच नाही तर आरोपी ज्या खोलीत राहत होता त्याचे भाडे महिन्याला १० हजार रुपये होते.