महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'पद्मश्री'साठी कंगना रणौतने कोणाकोणाचे तळवे चाटले? कृपाल तुमानेंचा सवाल - undefined

महात्मा गांधीं(Mahatma Gandhi)नी सत्तेची लालसा असती तर ते त्यावेळी पंतप्रधान, राष्ट्रपती सर्व काही होऊ शकले असते. कंगना रणौत(kangana ranaut)ला काय करून पद्मश्री मिळाला, असा सवाल शिवसेना खासदार कृपाल तुमाने (shivsena mp krupal tumane)यांनी उपस्थित केला आहे.

krupal tumane
krupal tumane

By

Published : Nov 18, 2021, 5:10 PM IST

Updated : Nov 18, 2021, 5:36 PM IST

नागपूर -महात्मा गांधीं(Mahatma Gandhi)नी सत्तेची लालसा असती तर ते त्यावेळी पंतप्रधान, राष्ट्रपती सर्व काही होऊ शकले असते. कंगना रणौत(kangana ranaut)ला काय करून पद्मश्री मिळाला, असा सवाल शिवसेना खासदार कृपाल तुमाने (shivsena mp krupal tumane)यांनी उपस्थित केला आहे.

krupal tumane

'काय केले ते सांगावे'

कंगना रणौतवर टीका करताना ते म्हणाले, की पद्मश्री मिळवण्यासाठी कंगनाने काय केले ते सांगावे. कोणाचे तळवे चाटले आणि काय काय चाटल्याने हे पद किंवा पुरस्कार मिळाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. माध्यमांनी तिला महत्त्व देऊ नये. सत्ताधाऱ्यांचे तळवे चाटून तिला हा पुरस्कार मिळाला आहे. हे दिल्लीतील सर्वच राजकारण्यांना माहीत आहे.

krupal tumane

'औकात नाही'

कंगना रणौतची महात्मा गांधींवर बोलण्याची लायकी नाही. असल्या हलकट आणि नालायक बाईविषयी मला काहीही बोलायचे नाही, असा घणाघात तुमाने यांनी केला आहे.

काय म्हणाली होती कंगना?

स्वातंत्र्य 1947 नाही तर 2014ला मिळाले होते. 1947 साली मिळाली ती भीक होती, असे ती म्हणाली होती. एवढ्यावरच न थांबता महात्मा गांधीवरही तिने टीका केली होती. 'एकतर तुम्ही गांधींचे चाहते आहात किंवा नेताजीचे समर्थक, तुम्ही दोघेही असू शकत नाही. निवडा आणि निर्णय घ्या,' असे कंगना रणौतने म्हटले आहे. कंगनाने दोन मोठ्या पोस्ट केल्या आहेत. पहिल्या पोस्टमध्ये कंगना म्हणते, 'ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, त्यांना सत्तेच्या भुकेल्या आणि धूर्त लोकांनी त्यांच्या मालकांच्या स्वाधीन केले होते. यांच्यात लढण्याची ताकद आणि हिंमत नव्हती, त्यांचे रक्तही उसळत नव्हते. हेच लोक आम्हाला शिकवतात की कोणी तुमच्या एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करा. याच प्रकारे तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. पण स्वातंत्र्य असे मिळत नसते. अशा प्रकार फक्त भीक मिळत असते. त्यामुळे आपले आदर्श निवडताना काळजी घ्या. हुशारीने आपले आदर्श निवडा,' असे कंगनाने म्हटले होते.

महात्मा गांधींवर केली होती टीका

'गांधींनी कधीही नेताजी आणि भगतसिंगांना समर्थन दिलेले नाही. भगतसिंगांच्या फाशीला गांधींचा पाठिंबा होता, असे बरेच पुरावे आहेत. यामुळे कोणाला पाठिंबा द्यावा आणि कोणाचे समर्थन करावे हे ठरवले पाहिजे. कारण हे सर्व मनात ठेवून त्यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देणे पुरेसे नाही. हे शांत राहाणे अतिशय बेजबाबदारपणाचे आहे. प्रत्येकाला त्यांचा इतिहास आणि आदर्श माहित असले पाहिजे, हे आवश्यक आहे.' असेही कंगनाने म्हटले.

Last Updated : Nov 18, 2021, 5:36 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details