सुरत ( गुजरात ) :शिवसेनेचे आमदार संजय राठोड ( MLA Sanjay Rathod ) हे एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या गोटात सहभागी होण्यासाठी गुवाहाटीला ( Shivsena MLAs In Guwahati ) रवाना झाले आहेत. तत्पूर्वी ते सुरत शहरातील हॉटेलमध्ये थांबले होते. सुरतमध्ये शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबवण्यात आले होते. त्यानंतर एअर लिफ्टिंग करुन त्यांना गुवाहाटीत नेण्यात आले. याठिकाणचा आढावा घेतलाय ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने..
काय घडलंय सुरतमध्ये : शिंदे यांना ४० पेक्षा अधिक आमदारांनी पाठिंबा दिला. सुरतमध्ये शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबवण्यात आले होते. त्यानंतर एअर लिफ्टिंग करुन त्यांना गुवाहाटीत नेण्यात आले. या सर्व आमदारांना ‘रेडीसन ब्लू’ हॉटेलमध्ये ठेवले आहे. सेनेचे ४० पेक्षा अधिक आमदारांनी पाठिंबा दिला असताना गुलाबराव पाटील, रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम, चंद्रकांत पाटील आणि मंजुळा गावित या गुवाहाटीत पोहचल्या. बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे गुलाबराव पाटील हे शिंदे यांच्या गोटात गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.