पणजी -गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची युती झाली आहे. येणारी गोवा विधानसभा निवडणूक ( Goa Assembly Election 2022 ) हे दोन्ही पक्ष सोबत लढवणार आहे. गोव्यात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी या युती बद्दल निर्यण घेतला आहे. उत्पल पर्रिकर हे जर स्वतंत्र लढणार असतील तर त्यांना आम्ही पाठिंबा देणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी ( Sanjay Raut statement about Utpal Parrikar ) दिली आहे.
उमेदवारांची यादी येत्या दोन दिवसांत घोषित -
राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे लढणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या उमेदवारांची यादी येत्या दोन दिवसांत घोषित करणार आहे
'अपक्ष लढल्यास उत्पल पर्रिकरांना आमचा पाठिंबा'
पणजी मतदारसंघातून उत्पल पर्रिकरांनी अपक्ष निवडणूक वाढविल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना पाठिंबा देणार आहेत, मात्र भाजपने मनोहर पर्रीकर यांचा मुलगा म्हणून उत्पल पर्रिकर यांना तिकीट नाकारल्यास हा मनोहर पर्रिकर यांचा अपमान असल्याचे राऊत यांनी सांगितले.