महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Danilimda Seat Election 2022 : दाणीलिमडा विधानसभा जागेवर काँग्रेसची हॅट्ट्रिक, शैलेश मनुभाई परमार विजयी

काँग्रेस पक्षाचे शैलेश मनुभाई परमार ( Shailesh Manubhai Parmar ) यांनी दलितबहुल दाणीलिमडा विधानसभा मतदारसंघात विजय मिळवून कोणत्याही लाटेत आपला पराभव करणे सोपे नसल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. दाणीलिमडा विधानसभा जागेवर सलग तिसरा विजय मिळवत त्यांनी हॅट्ट्रिक लावण्याचे काम केले आहे. येथे आम आदमी पक्षाचे कपाडिया दिनेशभाई सोमभाई दुसऱ्या क्रमांकावर राहिले. ( Shailesh Manubhai Parmar Hattrick On Danilimda Seat )

Gujarat Election Results 2022
काँग्रेस पक्षाचे शैलेश मनुभाई परमार

By

Published : Dec 9, 2022, 7:43 AM IST

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचे शैलेश मनुभाई परमार ( Shailesh Manubhai Parmar ) यांनी गुजरातमधील अहमदाबाद शहरातील अल्पसंख्याक आणि दलितबहुल दानिलिमडा विधानसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा विजय मिळवला आणि दाखवून दिले की कोणत्याही लाटेत त्यांचा पराभव करणे सोपे नाही. दाणीलिमडा विधानसभा जागेवर सलग तिसरा विजय मिळवत त्यांनी हॅट्ट्रिक लावण्याचे काम केले आहे. येथे आम आदमी पक्षाचे कपाडिया दिनेशभाई सोमभाई दुसऱ्या क्रमांकावर राहिले. ( Shailesh Manubhai Parmar Hattrick On Danilimda Seat )

याआधी दोन निवडणुकामध्ये विजयी : 2012 आणि 2017 मध्ये विधानसभेच्या दोन निवडणुका झाल्या होत्या आणि या दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसचे दिग्गज शैलेश परमार विजयी झाले होते. 2012 मध्ये 14,000 पेक्षा जास्त मतांनी आणि 2017 मध्ये 32,000 मतांनी विजय मिळवल्यानंतर, यावेळी त्यांच्या हॅट्ट्रिककडे लक्ष लागले होते. नरेश व्यास यांना या जागेवरून उभे करून भाजपने जोरदार दावा ठोकण्याचा प्रयत्न केला होता. नरेश व्यास 2005 च्या अहमदाबाद महापालिका निवडणुकीत भाजपचे नगरसेवक म्हणून निवडून आले. आदर्श आचारसंहितेचा भंग केल्यामुळे त्यांना त्यांचे निवडणूक कार्यालय बंद करावे लागले.यावेळी शैलेश परमार सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या जागेवर AIMIM ने कौशिका परमार या दलित उमेदवाराला उभे केले होते. ती ब्युटी पार्लर चालवते. दुसरीकडे, आम आदमी पक्षाने गुजरात विद्युत मंडळातील निवृत्त अभियंता दिनेश कपाडिया यांना उमेदवारी दिली होती.

काँग्रेसमध्ये प्रतिष्ठेची लढाई :अहमदाबाद शहरात अल्पसंख्याक आणि दलितबहुल दानिलिमडा विधानसभा जागा ताब्यात घेण्यासाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये प्रतिष्ठेची लढाई सुरू होती. सुमारे दशकभरापूर्वी अस्तित्वात आलेल्या या जागेवर भाजपने कधीही निवडणूक जिंकली नव्हती. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन आणि आम आदमी पक्ष यांच्यातही चौरंगी लढत होईल, अशी अपेक्षा असल्याने हा समज मोडून काढण्याच्या आशेने भाजपने यंदा निवडणुकीच्या मैदानात उतरले होते.

दानिलिमडा ही अनुसूचित जातीसाठी राखीव जागा : अहमदाबाद जिल्ह्यातील 21 विधानसभा जागांपैकी एक दानिलिमडा ही अनुसूचित जातीसाठी राखीव असलेली जागा आहे आणि येथे 5 डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यात निवडणुका झाल्या. ही जागा सीमांकनानंतर अस्तित्वात आली आणि 2012 आणि 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रमुख विरोधी पक्ष येथून विजयी झाला होता. 2017 मध्ये अहमदाबाद जिल्ह्यातील 21 जागांपैकी भाजपने 15 जागा जिंकल्या होत्या, तर उर्वरित 6 जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळवला होता.दानिलिमडा जागेवर सुमारे 2,65,000 नोंदणीकृत मतदार आहेत, त्यापैकी सुमारे 34 टक्के अल्पसंख्याक समुदायाचे आहेत, तर 33 टक्के दलित-अनुसूचित जाती (SC) समुदायाचे आहेत. बाकीचे पटेल आणि क्षत्रिय समाजातील आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details