हैदराबाद : शब-ए-बरात हा मुस्लिम समाजाच्या प्रमुख सणांपैकी एक आहे. ही पूजेची रात्र आहे. हा सण चंद्राच्या दर्शनावर अवलंबून असतो. इस्लाम धर्मात शाबान महिना अत्यंत शुभ मानला जातो. दीन-ए-इस्लामचा हा आठवा महिना आहे. शब-ए-बरातमध्ये पूजा करणाऱ्या लोकांचे सर्व पाप माफ होतात, असे म्हटले जाते. म्हणूनच शब-ए-बरातमध्ये लोक रात्रभर जागे राहतात, अल्लाहची उपासना करतात आणि त्यांच्या पापांसाठी क्षमा मागतात.
अशी साजरी होते शब-ए-बारात :शब-ए-बारातच्या निमित्ताने मुस्लिम समाजातील लोक मशिदी आणि स्मशानभूमीत जातात आणि स्वतःसाठी आणि त्यांच्या पूर्वजांसाठी देवाची प्रार्थना करतात. घरे खास सजवली जातात. मशिदीत नमाज अदा करून अल्लाहला त्यांच्या पापांची क्षमा मागितली जाते. या दिवशी हलवा, बिर्याणी, कोरमा आदी पदार्थ घरोघरी बनवले जातात. त्याच वेळी, पूजेनंतर, ते गरिबांमध्ये वाटले जाते.
स्मशानभूमीत सजावट : शब ए बारातच्या दिवशी मशिद तसेच स्मशानभूमीत सजावट केल्या जाते. कबरींवर दिवा लावून, त्यांच्या चुकांसाठी साठी क्षमा मागितली जाते. इस्लाममधील चार पवित्र रात्रींपैकी ती एक रात्र मानली जाते. पहिली आशुरा रात्र, दुसरी शब-ए-मेराज, तिसरी शब-ए-बरात आणि चौथी शब-ए-कदर अश्या चार रात्री महत्वाच्या असतात. इस्लाम धर्मात शाबान महिना अतिशय शुभ महिना आहे. 15 दिवसांनंतर रमजानचा पवित्र महिना सुरू होतो. त्यामुळे शब-ए-बरातनंतरच रमजानची तयारी सुरू होते.
विशेष का आहे :इस्लामिक कॅलेंडरनुसार, शब-ए-बरातची रात्र दरवर्षी एकदा शाबान महिन्याच्या 14 तारखेला सूर्यास्तानंतर सुरू होते. शब-ए-बारातचा अर्थ शब म्हणजे रात्र आणि बारात म्हणजे निर्दोष सुटणे. शब-ए-बारातच्या दिवशी, दिवंगत पूर्वजांच्या कबरांवर त्यांच्या प्रियजनांद्वारे दिवे प्रज्वलित केले जाते आणि प्रार्थना केली जाते. मान्यतेनुसार, या रात्री अल्लाह आपल्या प्रियजनांसोबत हिशेब चुकता करण्यासाठी येतो. या दिवशी जो प्रामाणिकपणे अल्लाहकडे त्याच्या पापांची क्षमा मागतो, त्यांच्यासाठी अल्लाह जन्नतचे दरवाजे उघडतो, अशी मान्यता आहे.
हेही वाचा : Gangaur 2023 : गणगौर पूजा कधी आहे?, का करतात महिला हे व्रत?, जाणून घ्या सविस्तर