रांची (झारखंड): Sexual Relations: झारखंड हायकोर्टाने आपल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयात म्हटले आहे की, जर एखाद्या विवाहित महिलेने संमतीच्या आधारावर तिच्या पतीशिवाय अन्य पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवले तर नंतर ती तिच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करू शकत नाही. न्यायालयाने म्हटले आहे की, विवाहित महिलेने लग्नाच्या आश्वासनावर अवलंबून असलेल्या व्यक्तीशी संबंध ठेवल्यानंतर ते लैंगिक शोषणाचे प्रकरण कसे बनवू शकते? Sexual relation with consent is not rape
न्यायमूर्ती एसके द्विवेदी यांच्या न्यायालयाने मनीष कुमार नावाच्या व्यक्तीच्या याचिकेवर सुनावणी करताना हा आदेश दिला आणि कनिष्ठ न्यायालयाने त्याच्याविरुद्ध घेतलेली दखल रद्द केली. विवाहितेच्या आईने देवघर जिल्हा न्यायालयात मनीष कुमारविरुद्ध तक्रार दाखल केली होती. यामध्ये देवघर येथील श्रावणी जत्रेदरम्यान त्यांची मुलगी मनीष कुमार यांच्याशी संपर्क झाल्याचे म्हटले होते.